Home Accident News अहमदनगर भीषण अपघात: भरधाव डंपरखाली १९ मेढ्यांचा चिरडून मृत्यू – Accident

अहमदनगर भीषण अपघात: भरधाव डंपरखाली १९ मेढ्यांचा चिरडून मृत्यू – Accident

Ahmednagar Accident | अहमदनगर: नगर औरंगाबाद रोडवर पोखर्डी गावाजवळ भरधाव वेगाने जाणाऱ्या खडीच्या डंपरखाली चिरडून १९ मेढ्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर २५ मेंढ्या जखमी झाल्या आहेत. गुरुवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे.  

Ahmednagar Accident 19 sheep crushed to death under Bhardhaw dumper

नगर-औरंगाबाद रस्त्यावर पोखर्डी गावाजवळ भरधाव वेगाणे जाणार्‍या खडीच्या डंपर खाली (एम.एच. 16 ए.वाय 6599) चिरडून 19 मेंढ्यांचा मृत्यु झाला आहे. तर आणखी 25 मेंढ्या जायबंदी झाल्याची घटना गुरूवारी दुपारी 4 च्या सुमारास घडली.

एमआयडीसी पोलीस ठाण्याचा ताफा ताबडतोब घटनास्थळी पोहचल्यानंतर मयत आणि जायबंद मेंढ्यांच्या नोंद घेण्यात आली. तत्पूर्वी ज्या डंपरखाली मेंढ्या चिरडल्या गेल्या त्या डंपरच्या (एम.एच. 16 ए.वाय 6599) चालकाचा डंपरवरील ताबा सुटुन डंपर रस्ता दुभाजकावर चढला सबंध रस्ताभर मेंढ्याच्या मांसाचा खच पडलेला होता. या घटनेमुळे नगर-औरंगाबाद महामार्गावरील वाहतुक ठप्प झाली होती.

त्यावेळी स्थानिक रहिवासी जगन्नाथ निमसे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी वाहतूक  कोंडी सुरळीत करण्यासाठी पोलीसांना मदत केली. मेंढ्यांचे कळप हे पुरंदर तालुक्यातील रहिवासी असून ते मेंढ्यांच्या कळपासह नाशिकला मेंढ्या चरायला गेले होते. येतांना ते मनमाड-औरंगाबाद रस्त्याने नगर मार्गे पुण्याकडे चालले होते. मात्र, नगर औरंगाबाद रस्त्यावर त्यांच्यावर हा दुर्दैवी प्रसंग ओढवला. या अपघातामुळे या धनगर मेंढपाळांचे लाखोंचे नुकसान झाले आहे.

Web Title: Ahmednagar: Accident 19 sheep crushed to death under Bhardhaw dumper

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here