Home संगमनेर संगमनेर: अल्पवयीन मुलीस फूस लावून पळविले

संगमनेर: अल्पवयीन मुलीस फूस लावून पळविले

Sangamner minor girl was kidnap by seduction

Sangamner | संगमनेर:  संगमनेर तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीला पळवून (Kidnap) नेणाऱ्या तिघाच्या मुसक्या आश्वी (Ashwi) पोलिसांनी अवघ्या तीन दिवसात आवळल्या असून या मुलीला कुटुंबाच्या ताब्यात देण्यात आले आहे. याबाबत आश्वी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात  आला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, १ जुलै रोजी रात्री १५ वर्षीय मुलगी ही कुटुंबियासमवेत घरात झोपलेली होती. पहाटे ४.३० वाजेच्या सुमारास कुटुंबातील व्यक्तीना जाग आल्यानतंर ती आढळून न आल्यामुळे मुलीचा परिसरात शोध घेतला परंतू ती सापडली नाही. त्यामुळे जवळचे नातेवाईक तसेच इतरत्र शोध घेऊनही मुलगी आढळून आली नाही. त्यामुळे आश्वी पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता. यावेळी घटनेतील गांभिर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक सुभाष भोये यांनी काही संशयिताना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता पोलिसांच्या हाती धागेदोरे सापडले होते. त्यामुळे पोलीस निरीक्षक सुभाष भोये यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार शिवाजी पवार, गुप्तवार्ता विभागाचे विनोद गंभिरे, हेड कॉस्टेबल वाकचौरे, पारधी, पाटोळे, ब्राम्हणे, दिघे, सोनवने, निलेश वर्षे, रणधीर, दांडगे, शिंदे यांच्या पथकाने आरोपी विवेक उर्फ विकी रविंद्र मुन्तोडे ( वय १९, रा. शिबलापूर, ता. संगमनेर), गोरक्ष धोंडीबा कदम (वय ३४, रा. कनोली, ता. संगमनेर ) व अक्षय मुन्तोडे ( पुर्ण नाव माहित नाही) यांना शिताफीने पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यावेळी आश्वी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सुभाष भोये करीत आहेत.

Web Title: Sangamner minor girl was kidnap by seduction

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here