Home पुणे Rape | उपचारासाठी आलेल्या अल्पवयीन मुलीशी डॉक्टरने जवळीक साधत केला बलात्कार

Rape | उपचारासाठी आलेल्या अल्पवयीन मुलीशी डॉक्टरने जवळीक साधत केला बलात्कार

doctor rape the minor girl who came for treatment

Pune Crime | पुणे: मणक्याच्या आजारावर उपचारासाठी आलेल्या अल्पवयीन मुलीशी जवळीक साधत डॉक्टरने तिच्यावर बलात्कार (Rape) केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

डॉ. योगेश लक्षमण वाल्हे वय २५ औंध यास याप्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी शिवतीर्थनगर येथे राहणाऱ्या एका १९ वर्षाच्या तरुणीने कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद (गु. रजि. नं. १६१/२२) दिली आहे. हा प्रकार १० नोव्हेंबर २०१९ ते डिसेबर २०२० दरम्यान श्री अॅक्युपंक्चर पौड रोड व फिर्यादीच्या घरी घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या अल्पवयीन असताना मणक्याच्या आजारासाठी डॉ.वाल्हे याच्या क्लिनिकमध्ये गेल्या होत्या.

यावेळी तिच्या वयाचा गैरफायदा घेऊन डॉक्टरने तिच्याशी जवळीक साधत अंगाला स्पर्श करुन फिर्यादीला किस केले. मणक्याच्या आजारावर उपचार करण्याच्या बहाण्याने क्लिनिकमध्ये तिच्या मर्जीविरुद्ध जबरदस्तीने शारीरीक संबंध (sexual ralation) केले. तिचे नग्न अवस्थेमधील फोटो मोबाईलमध्ये काढले, हा प्रकार कोणाला सांगितल्यास तुझे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन शारीरीक संबंध केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक खेतमाळीस अधिक तपास करीत आहेत.

Web Title: doctor rape the minor girl who came for treatment

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here