Home अहमदनगर Accident: अज्ञात वाहनाच्या धडकेत एक जण ठार

Accident: अज्ञात वाहनाच्या धडकेत एक जण ठार

Accident One person was killed in a collision with an unknown vehicle

Parner | पारनेर: अहमदनगर महामार्गावर पळवे खुर्द शिवारात अज्ञात वाहनाच्या धडकेत एका ७० वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी रात्री घडली आहे. याबाबत अमोल अशोक शेळके रा. पळवे यांनी सुपा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मंगळवारी रात्री 10.30 वाजता पुणे नगर महामार्गावर पळवे खुर्द शिवारात हाँटेल सह्याद्री जवळ एका अज्ञात वहानाने धडक दिल्याने रस्त्याने पायी जात आसलेला 70 वर्षीय वृद्ध जखमी झाला.

माहिती मिळताच सुपा पोलिसांनी त्यास अहमदनगर येथील सिव्हील रुग्णालयात दाखल केले. परंतु तत्पुर्वीच त्याचा मृत्यू झाला. याबाबत सुपा पोलीस स्टेशनला अज्ञात वाहन चालका विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुनील कुटे पुढील तपास करत आहे.

सदर व्यक्ती व्यक्ती 70 वर्षीय असून त्यांचा एक डावा डोळा निरुपयोगी आहे. अंगात पाढरा नेहरु, पायजमा असून आतमध्ये भगव्या रंगाची कोपरी आहे. या वर्णनाच्या व्यक्तीबाबत कोणास माहिती असल्यास सुपा पोलिसांशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Accident One person was killed in a collision with an unknown vehicle

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here