Home नंदुरबार संतापजनक: चिमुकलीवर अत्याचार करून टाकीत फेकले, चार नराधमाना अटक

संतापजनक: चिमुकलीवर अत्याचार करून टाकीत फेकले, चार नराधमाना अटक

Chimukali was molestation and thrown into a tank

Nandurbar | नंदुरबार: एका रेल्वे कॉलनी परिसरात माणुसकीला काळीमा फासणारी धक्कादायक घटना घडली आहे.  दोन वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिला गटाराच्या टाकीत फेकल्याचा धक्कादायक प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे.  नराधमांनी अत्याचार करून तिचा गळा दाबून निर्घुण हत्या केल्याचे शवविच्छेदन अहवालातून समोर आले आहे.

याप्रकरणी एका दाम्पत्यासह चार जणांना अटक केली. दरम्यान गुजरातमधून या मुलीचा मृतदेह आणला असल्याची माहिती उघड झाली आहे.

नंदुरबारचे पोलीस अधिक्षक पी आर पाटील यांनी दिलेली माहिती अशी की, नंदुरबारच्या एका रेल्वे कॉलनी परिसरात दोन वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करुन तिची हत्या करण्यात आली. पीडित मुलीबाबत कोणतीही माहिती पोलिसांना मिळाली नसून अधिक तपास पोलिसांकडून सुरु आहे. याप्रकरणी अटक केलेले चार आरोपी भंगार गोळा करण्याचे काम करतात. पीडितेवर एकाहून अधिक व्यक्तीने शारिरीक अत्याचार केले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपींनी कोणत्या उद्देशाने हा निर्दयी प्रकार केला, याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत. पोलिसांनी आरोपींना अटक केली असली तरी, या क्रूर घटनेमुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.  

Web Title: Chimukali was molestation and thrown into a tank

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here