Home अहमदनगर सासूच्या निधनानंतर काही मिनिटांतच सुनेने घेतला अखेरचा श्वास

सासूच्या निधनानंतर काही मिनिटांतच सुनेने घेतला अखेरचा श्वास

Within minutes of her mother-in-law's death, Sune took her last breath

Rahuri | राहुरी: समाजात सासू सुनेचे वाद विकोपाला गेल्याच्या घटना आपण ऐकल्या असतील मात्र सासूच्या मृत्यूनंतर अवघ्या अर्ध्या तासातच सुनेने देखील अखेरचा श्वास घेतल्याची घटना घडली आहे. सासू व सून दोघी मिळून मृत्यूच्या प्रवासाला सामोरे गेल्या. त्यांचे प्रेम पाहून अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे.

राहुरी शहरातील आझाद चौक परिसरात शेजूळ कुटूंब रहावयास आहे. त्या कुटुंबातील सासू- मालनबाई पांडुरंग शेजूळ यांना काल पहाटे अचानक त्रास होऊ लागला. घरातील नातेवाईकांनी त्यांना शहरातील एका रुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र, पहाटे एक वाजे दरम्यान हदयविकाराने त्या मयत झाल्या. काही वेळातच सून मिराबाई भाऊसाहेब शेजूळ, (वय 55 वर्षे) यांना त्रास होऊ लागल्याने त्यांना देखील त्याच रूग्णालयात दाखल करण्यात आले.

सासू मयत झाल्याचे समजताच त्यांना हदयविकाराचा तिव्र झटका आला. आणि पहाटे दीड वाजे दरम्यान म्हणजे सासू मयत झाल्याच्या अवघ्या अर्ध्या तासाने सुनेने अखेरचा श्वास घेतला. सुनेने अखेरच्या श्वासापर्यंत सासूची साथ सोडली नाही. मृत्यूनंतरच्या प्रवासाला देखील दोघी बरोबरच राहिल्या. मृत्यूनंतर सासू मालनबाई व सून मिराबाई या दोघींची अंत्ययात्रा एकामागे एक त्यांच्या घरापासून ते गणपती घाटापर्यत नेण्यात आली.

Web Title: Within minutes of her mother-in-law’s death, Sune took her last breath

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here