Breaking: विजेच्या धक्क्याने चार तरुणांचा मृत्यू
Aurangabad | औरंगाबाद: विद्युत तारेच्या धक्क्याने चार तरुण कामगारांचा जागीच मृत्यू (Death) झाल्याची घटना कन्नड तालुक्यातील हिवरखेडा नाद्गीरवाडी शिवारात शुक्रवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली. मयत तरुण हे हिवरखेडा नजीकचे नावडी गावाचे रहिवासी होते.
हिवरखेडा-नांदगीरवाडी शिवारात उच्चदाब वितरण प्रणालीद्वारे शेतकऱ्यांना पुरवठा करण्यात येणाऱ्या वीज योजनेअंतर्गत खांबांवरून तारा ओढण्याचे काम मृत तरुण करत होते. मात्र, याच परिसरात एका अज्ञाताने अंथरलेल्या तीनशे फूट तारेचा स्पर्श त्यांना झालेला असावा आणि त्यातच चौघांचाही विजेचा तीव्र धक्का लागून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र, प्रत्यक्ष काम सुरू करण्याबाबतची सूचना कार्यालयाला देण्यात आलेली नव्हती. या प्रकरणात आता विद्युत निरीक्षक यंणणेकडून अधिक चौकशी करून पुढील कार्यवाही केली जाईल, असे महावितरणकडून व त्यांच्या उच्च पदस्थ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
गणेश थेटे (वय ३५), भारत वरकड (३५), जगदीश मुरकुंडे (३७) व अर्जुन मगर (२६), अशी मयत तरुणांची नावे आहेत. या माहितीला नावडीचे माजी सरपंच पांडुरंग विश्वनाथ आढाव, कन्नड ग्रामीण पोलीस ठाण्याचे कर्मचारी धानोरे व महावितरणच्या जनसंपर्क विभागाकडूनही दुजोरा मिळाला आहे. चारही मृतदेहांचे शवविच्छेदन कन्नड येथील ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले. यावेळी गावातील तरुण, ज्येष्ठ मोठ्या संख्येने जमा झालेले होते. मृतांपैकी अर्जुन मगर हा अविवाहित तर अन्य तिघेही विवाहित होते, अशी माहिती माजी सरपंच पांडुरंग आढाव यांनी दिली.
Web Title: Four youths Death in electric shock