खळबळजनक! नाशिकमध्ये महिलेचा खून, भाचा गंभीर जखमी
Breaking News | Nashik Crime: एका विवाहितेचा निर्घृण खून (Killed) तर तिच्या भाच्यावर गंभीर हल्ला झाल्याचं समोर.
नाशिक: जिल्ह्यातील सामनगावमध्ये एका विवाहितेचा निर्घृण खून तर तिच्या भाच्यावर गंभीर हल्ला झाल्याचं समोर आले आहे. रात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्ती घरात घुसून विवाहितेवर आणि तिच्या भाच्यावर हल्ला केल्याची घटना घडली आहे.
एकलहरा गेटजवळील सामनगाव येथे अज्ञात इसमांनी विवाहितेच्या गळ्यावर तीक्ष्ण हत्याराने वार करून तिचा निर्घृण खून केल्याची घटना घडली आहे. या मृत महिलेच्या भाच्यावर देखील तीक्ष्ण हत्याराने वार करून त्याला गंभीर जखमी केले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मूळ उत्तर प्रदेशातील सुदाम बनेरिया हा तरुण पाणीपुरी विक्रीचा व्यवसाय करतो. सामनगाव येथील तांबोळी हॉस्पिटलशेजारी भाडेतत्त्वावर घेतलेल्या खोलीत सुदाम हा पत्नी क्रांती (वय २७) व दोन लहान मुलांसह राहतो.
बुधवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास क्रांती व त्यांचा भाचा अभिषेक सिंग (वय २२) हे दोघे घरात एकटे होते. यावेळी अज्ञात इसमांनी घरात घुसून क्रांतीच्या गळ्यावर तीक्ष्ण हत्याराने वार करून तिचा निर्घृण खून केला. तसंच अभिषेकवर वार करून गंभीर जखमी केले.ल्याची घटना रात्री घडली आहे. हे कुटुंब मूळचं उत्तर प्रदेशमधील आहे.
गळ्यावर वार झाल्यामुळं क्रांती रक्ताच्या थारोळ्यात पडली. त्यानंतर हल्लेखोर पसार झाले. जखमी अवस्थेत अभिषेक आरडाओरडा करत बाहेर आला. त्यानंतर आजूबाजूच्या रहिवाशांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेची माहिती मिळतच नाशिकरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. अभिषेकला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. हा हल्ला नेमका कोणत्या कारणामुळे झाला व कोणी केला, याचा अधिक तपास नाशिक रोड पोलीस करत आहे. या घटनेमुळं परिसरात खळबळ उडाली आहे.
Web Title: Woman killed, nephew seriously injured in Nashik
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study