Home क्राईम धक्कादायक! महिलेवर चौघांनी सामूहिकरीत्या बलात्कार, प्रियकरासोबत मोटारसायकलवर गेली अन…..

धक्कादायक! महिलेवर चौघांनी सामूहिकरीत्या बलात्कार, प्रियकरासोबत मोटारसायकलवर गेली अन…..

Gang Rape: घोडेगाव गावाजवळ असणाऱ्या अज्ञात ठिकाणी नेऊन चौघांनी मिळून एका महिलेवर आळीपाळीने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना.

a woman was Gang rape alternately by four people who took her to an unknown place

पुणे: पुणे जिल्ह्यात दिवसेंदिवस बलात्काराच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसून येत आहे. त्यातच पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात असणाऱ्या घोडेगाव गावाजवळ असणाऱ्या अज्ञात ठिकाणी नेऊन चौघांनी मिळून एका महिलेवर आळीपाळीने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने संपूर्ण आंबेगाव तालुका हादरला आहे. या प्रकरणात घोडेगाव पोलिसांनी चौघांपैकी एकाला ताब्यात घेतलं आहे. याबाबत घोडेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तिघांचा शोध घेण्याचं काम सुरू आहे. या घटनेनं आंबेगाव तालुक्यात एकच खळबळ उडाली

याबाबत अधिक माहिती अशी की, शुक्रवार (दि.२३) रोजी पीडित महिला आकाश चंद्रकांत भालेराव या त्यांच्या प्रियकरासोबत मोटारसायकल वरून अज्ञात ठिकाणी जात होते. त्यावेळी मोटरसायकल वरून संदेश अशोक जाधव, संजय आणि आदेश अशोक जाधव हे तिघे आले. त्यांनी महिलेच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने अंगावरील कपडे काढून आळीपाळीने सामूहिकरीत्या बलात्कार केला. “याबाबत जर कोणाला सांगितले तर तुला जिवंत सोडणार नाही”, अशी धमकी दिली.

मात्र, महिलेने तात्काळ घोडेगाव पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. घडलेल्या प्रकाराबाबत पोलिसांना आपबीती सांगितली. पोलिसांनी घटनेचं गांभीर्य ओळखत चौघांविरोधत तक्रार दाखल केली. यातील आकाश चंद्रकांत भालेराव याला पोलिसांनी पकडले असून तिघांचा तपास सुरू आहे. सदर गुन्हा पोलीस उपनिरीक्षक महेश पवार यांनी दाखल केला आहे. तर पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांची टीम करत आहे.

Web Title: a woman was Gang rape alternately by four people who took her to an unknown place

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here