Home क्राईम Fire Attack: रस्त्यात गाडी अडवून केला गोळीबार

Fire Attack: रस्त्यात गाडी अडवून केला गोळीबार

Jalana Crime:  अंबडमध्ये एकावर रात्री दोन अनोळखी इसमांनी गोळ्या झाडून (fire attack) हल्ला केल्याची घटना.

car was blocked on the road and opened fire

जालना: जालना जिल्ह्यातल्या अंबडमध्ये एकावर रात्री दोन अनोळखी इसमांनी गोळ्या झाडून हल्ला केल्याची घटना घडली. या घटनेत राधाकिसन पुंडलिक पिवळ हे गंभीर जखमी झाले आहेत.

जालना जिल्‍ह्यातील अंबडमध्‍ये मध्यरात्रीच्या सुमारास राधाकिसन पिवळ हे वाईन शाॅप बंद करून दुचाकीवरून मार्डी रोडने घरी जात होते. या दरम्‍यान चव्हाण यांच्या शेताजवळ पिवळ यांना दोन अनोळखी इसमांनी दुचाकीवर येऊन अडविले. त्यांच्या जवळील असलेली पैशांची बॅग मागितली असता राधाकिसन पिवळ यांनी त्यांना बॅग देण्यास नकार दिला. त्यावेळी या दोन अनोळखी इसमांनी त्यांच्यावर गोळ्या झाडण्यास सुरवात केली आणि त्यांच्याजवळ असलेली पैशांची बॅग घेवून पसार झाले.

गोळीबारात राधाकिसन हे गंभीर जखमी झाले असून त्यांना छत्रपती संभाजीनगर येथे खाजगी रुग्णालयात उपचारसाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान पोलिसांना याची माहिती मिळाली असता घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून दोन अज्ञात हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलिस करत आहेत.

Web Title: car was blocked on the road and opened fire

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here