Home क्राईम संगमनेरातील घटना: अंगावर पेट्रोल ओतून महिलेला पेटविले

संगमनेरातील घटना: अंगावर पेट्रोल ओतून महिलेला पेटविले

Sangamner woman was set on fire by pouring petrol on her body

संगमनेर | Sangamner Crime:  जुन्या भांडणाच्या कारणावरून महिलेच्या घरातील सामानाची मोडतोड करून तिच्या अंगावर पेट्रोल ओतून तिला पेटविल्याची (Fire) घटना काल सकाळी साडे आठ वाजेच्या सुमारास शहरातील अकोले नाका परिसरात घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी 13 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यामध्ये बाळु (पुर्ण नाव माहित नाही) योगेश सुर्यवंशी, शिवानी योगेश सुर्यवंशी, सागर (पुर्ण नाव माहित नाही), मनोहर (पुर्ण नाव माहित नाही), सचिन (पुर्ण नाव माहित नाही), साक्षी सचिन (पुर्ण नाव माहित नाही), उमेश (पुर्ण नाव माहित नाही), स्वाती उमेश (पुर्ण नाव माहित नाही), विनोद सुर्यवंशी, विनोद सुर्यवंशीची बायको, संध्या खरे, बाळासाहेब (पुर्ण नाव माहित नाही) असे सुमारे 20 ते 25 जण माझ्यासमोर आले. त्यांच्यापैकी एकाने माझ्या पाठीवर विटेच्या तुकड्याने जोरात मारले. सर्व जणांनी मला मारहाण केली.

मी माझी सुटका करून घेवून पळाले असतांना योगेश सुर्यवंशी याने पेट्रोलची बाटली आणून माझ्या अंगावर ओतली. त्यावेळी सचिन सुर्यवंशी, अरुणा सुर्यवंशी असे सर्वजण तिथे उभे राहुन मला शिवीगाळ करत होते. त्यापैकी एकाने माझ्या अंगावर काडेपेटीची काडी पेटवुन टाकली. त्यावेळी माझी साडी जळाली. तसेच माझ्या हातापायास, मानेवर, पोटावर जळाले. मला त्रास होवु लागल्याने मी तिथे उभे असलेली संध्या खरे हिला मिठी मारली. त्यामध्ये ती पण भाजली. त्यावेळी बाळु याने आमच्या अंगावर पाणी ओतले. याबाबत शहर पोलिसांना माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी सदर महिलेस उपचारासाठी दवाखान्यात हलविले.

याबाबत परिघा सूर्यवंशी हिने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी योगेश मनोहर सुर्यवंशी, मनोहर बाबुराव सुर्यवंशी, सागर मनोहर सुर्यवंशी, सचिन मनोहर सुर्यवंशी, उमेश मनोहर सुर्यवंशी, बाळासाहेब बाबुराव सुर्यवंशी यांच्यासह एकूण 13 जणांविरुद्ध गुन्हा (crime) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस करीत आहे.

Web Title: Sangamner woman was set on fire by pouring petrol on her body

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here