संगमनेर: नाशिक पुणे महामार्गावर मालवाहू ट्रकने रस्त्यातच घेतला पेट
संगमनेर | Sangamner: सोलापूरहून नाशिकला सिमेंट घेऊन जाणाऱ्या ट्रकला शोर्टसर्किटमुळे आग (Fire) लागली. ही घटना सोमवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास नाशिक पुणे महामार्गावरील संगमनेर तालुक्यातील कर्हे घाटात घडली. सुदैवाने या अपघातात जीवितहानी झाली नाही. मात्र ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे.
चालक नरेश विठ्ठल मिथा रा. सोलापूर हा सोलापूर येथून ट्रक क्रमांक एमएच १३ डी.क़्य. ४४६६ मधून सिमेंट घेऊन नाशिकला निघाला होता. तो सोमवारी पहाटे संगमनेर तालुक्यातील कर्हे घाटात आला असता अचानक शोर्टसर्किट झाल्याने ट्रकने पेट घेतला. चालक मिथा याने याबाबतची माहिती शहर पोलिसांना दिली. पोलिसांनी अग्निशमन दलाला पाचारण केले. यात ट्रकचे सर्व टायर जळाले. घटनास्थळी डोळसने मदत केंद्राचे पथक रवाना झाले होते. त्यांनी वाहतूक सुरळीत केली. एकेरी वाहतूक सुरु होती.
Web Title: Sangamner Nashik-Pune highway, a freight truck caught fire on the road