Home अहमदनगर ट्रॅक्टरखाली चिरडून शाळकरी मुलाचा मृत्यू तर दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

ट्रॅक्टरखाली चिरडून शाळकरी मुलाचा मृत्यू तर दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

Schoolboy dies after being crushed under tractor Accident 

Ahmednagar | श्रीगोंदा | Shrigonda: तालुक्यातील बेलवंडी येथे एका शाळकरी मुलाचा तर काष्टी येथे एका जेष्ठ नागरिकाचा अपघाती (Accident) मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. एक घटना रविवारी तर एक घटना सोमवारी सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास घडली.

बेलवंडी येथे ट्रॅक्टरखाली चिरडून राहुल केशव लबडे वय १५ या शाळकरी मुलाचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी दुपारी घडली. सोमवारी सकाळी साडे अकरावाजेच्या सुमारास श्रीगोंदा काष्टी रस्त्यावर दुचाकीला एका चार चाकी वाहनाने पाठीमागून धडक दिली. यामध्ये पेडगाव येथील दुचाकीस्वार संभाजी शिवराम भोसले वय ७० यांचा जागीच मृत्यू झाला.

बेलवंडी येथे राहुल लबडे हा कांद्याच्या ट्रॅक्टरजवळ उभा होता. त्याच्या अंगावर ट्रॅक्टरला जोडलेली ट्रोली पडली. यामध्ये राहुलचा जागीच मृत्यू झाला. याबाबतची खबर सुभाष ढवळे यांनी दिली.

संभाजी भोसले हे दुचाकीवरून चालले असता काष्टी येथे त्यांना एका चार चाकी वाहनाने पाठीमागून धडक दिली. त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर ते वाहन चालक व वाहन घेऊन तेथून पसार झाले.   

Web Title: Schoolboy dies after being crushed under tractor Accident 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here