Home अकोले अकोले: अवकाळी पावसाने वीज कोसळून गायीचा मृत्यू, एक जण भाजला

अकोले: अवकाळी पावसाने वीज कोसळून गायीचा मृत्यू, एक जण भाजला

Akole untimely rain caused a lightning strike, killing a cow and burning one

Akole | अकोले: अकोले तालुक्यातील बोरी (शेंगाळवाडी) येथे अवकाळी पावसाने वीज (lightning strike) कोसळून रामकृष्ण तुकाराम शेंगाळ यांच्या शेतात आंब्याच्या खोडाला बांधलेल्या गायीचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली. यात त्यांचे सुमारे ६० हजार रुपयांचे नुकसान झाले.

बोरी शेंगाळवाडी परिसरात शनिवारी सायंकाळी ढगांच्या गडगडाटासह पाउस झाला. दरम्यान रामकृष्ण शेंगाळ यांच्या घराजवळ वीज कोसळली. या आवाजाने रामकृष्ण हातातील लोखंडी फावडे व दाताळ फेकून घराकडे पळाले. नंतर गायीकडे जाऊन पाहिले असता अंदाजे ६० हजार रुपये किमतीची गाय मृत दिसली. माजी सरपंच संजय साबळे यांना याबाबत समजताच त्यांनी पशुवैद्यकीय डॉक्टर लहामटे यांना कळविले. त्यानी व तलाठी सदर घटनेचा पंचनामा केला. तर शेंगाळवाडीतील एकनाथ शेंगाळ यांच्या पायावर वीज पडल्याने पाय भाजला असून अकोले येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.  

Web Title: Akole untimely rain caused a lightning strike, killing a cow and burning one

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here