Home संगमनेर संगमनेर:  हॉस्पिटलमधून महिलेची सोन्याची चार तोळ्याची पोत लंपास

संगमनेर:  हॉस्पिटलमधून महिलेची सोन्याची चार तोळ्याची पोत लंपास

Breaking News | Sangamner: हॉस्पिटलमधून एका महिलेच्या पर्समधून अज्ञात चोरट्याने १ लाख २० हजार रुपये किंमतीची चार  तोळे सोन्याची पोत चोरून नेल्याची घटना.

woman's four tola gold texture was stolen from the hospital

संगमनेर: शहरातील नामांकित मेडिकव्हर  हॉस्पिटलमधून एका महिलेच्या पर्समधून अज्ञात चोरट्याने १ लाख २० हजार रुपये किंमतीची चार  तोळे सोन्याची पोत चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. यामुळे रुग्णांसह नातेवाईकांमध्ये भीती पसरली आहे.

याबाबत शहर पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, की सीताबाई सुधाकर आव्हाड ही महिला  नाशिक जिल्ह्यातील सातपूर येथील रहिवाशी असून, त्या रविवार दि. २५ फेब्रुवारी रोजी संगमनेर तालुक्यातील देवगड येथे यात्रेनिमित्त देव दर्शनासाठी आल्या होत्या. त्याच दरम्यान त्यांचे पती सुधाकर यांना त्रास होवू लागल्याने उपचारासाठी शहरातील मेडिकव्हर या हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. त्यांच्यावर औषधोपचारही सुरू होते. बुधवार दि. २८ रोजी रात्री जेवण करून त्या पतीजवळ थांबल्या होत्या. त्याचवेळी त्यांनी आपल्या गळ्यातील चार तोळे सोन्याची पोत पर्समध्ये काढून ठेवली होती आणि त्या झोपी गेल्या होत्या. दरम्यान, खोलीचा दरवाजा उघडा होता. सकाळी त्यांनी पर्स उघडून पाहिली असता त्यात सोन्याची पोत मिळून आली नाही. त्यामुळे चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. याप्रकरणी सीताबाई आव्हाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुरनं. १७३/२०२४ भादंवि कलम ३७९ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करत आहे.

Web Title: woman’s four tola gold texture was stolen from the hospital

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here