Home अहिल्यानगर अहिल्यानगर: जिल्ह्यासाठी दोन दिवस यलो अलर्ट; लक्ष्मीपूजनाला पावसाची हजेरी

अहिल्यानगर: जिल्ह्यासाठी दोन दिवस यलो अलर्ट; लक्ष्मीपूजनाला पावसाची हजेरी

Breaking News | Ahilyanagar Rain Update: दिवाळीची धूम सुरू असतानाच मंगळवारी दुपारी जिल्ह्यातील अनेक भागांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाल्याने खरेदीसाठी घराबाहेर पडलेल्या नागरिकांची धावपळ.

Yellow alert for two days for the district Rain likely on Lakshmi Puja

अहिल्यानगर : शहरासह जिल्ह्यात सर्वत्र दिवाळीची धूम सुरू असतानाच मंगळवारी दुपारी जिल्ह्यातील अनेक भागांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाल्याने खरेदीसाठी घराबाहेर पडलेल्या नागरिकांची धावपळ उडाली. दुसरीकडे लक्ष्मी पूजनाचे साहित्य विक्रीला घेऊन बाजारात बसलेल्या विक्रेत्यांनाही अचानक सुरू झालेल्या पावसाचा फटका बसला. याचा परिणाम फुलांसह इतर वस्तूंच्या किमतीवर झाल्याचे दिसून आले. सायंकाळी उशिरा पुन्हा बाजारात गर्दी दिसून आल्याने विक्रेत्यांना दिलासा मिळाला.

भारतीय हवामान विभागाने अहिल्यानगर जिल्ह्यासाठी पुढील दोन दिवस हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. तर, २४, २५ ऑक्टोबर असे दोन दिवस यलो अलर्ट जारी करण्यात आला असून, तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह ३०-४० किमी प्रतितास वेगाने वारा वाहण्याची शक्यता असून, मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे.

रब्बी हंगामाला आला वेग

सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टी व पुराच्या नैसर्गिक आपत्तीमधून सावरत शेतकऱ्यांनी रब्बी हंगामाची तयारी सुरू केली आहे. ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीलाच मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू झाल्याने पावसाने उघडीप दिली होती. जिल्ह्यातील काही भागांत रब्बी हंगामाची लागवड आणि पेरणी सुरू असून, शेतीच्या कामांना वेग आला आहे.

परतीच्या पावसाची हजेरी

श्रीगोंदा तालुक्यात सर्वाधिक ३६.३ मिमी, तर जामखेड तालुक्यात ३४.८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. शिवाय कर्जत २४.५ मिमी, पाथर्डी २५.८ मिमी, नगर २४.८ मिमी, राहाता २३.१ मिमी, पारनेर १५.२ मिमी, शेवगाव १७.५ मिमी आणि श्रीरामपूर तालुक्यात १६.६ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

ऑक्टोबर महिन्यातही परतीच्या पावसाने हजेरी लावली असून, आतापर्यंत १७.५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर, मान्सून सुरू होण्यापूर्वीच मे महिन्यात १२० मिमी अवकाळी पावसाची नोंद झाली होती. जिल्ह्यात जून ते डिसेंबर असे सात महिन्यांत ५४७.३ मिमी पाऊस होत असतो. यंदा दरवर्षीच्या सरासरीपेक्षा अधिक पाऊस होण्याचा अंदाज आहे.

Breaking News: Yellow alert for two days for the district Rain likely on Lakshmi Puja

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here