Home पालघर तरुणीला भररस्त्यात संपवून तरुण फरार; जवळच्या धरणावर आयुष्य संपवलं

तरुणीला भररस्त्यात संपवून तरुण फरार; जवळच्या धरणावर आयुष्य संपवलं

Palghar: विद्यार्थिनीची हत्या करून तरुणाने धरणाजवळ गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची घटना.

young man absconded after killing the young woman He ended his life 

पालघर: कोयत्याने गळा चिरून विद्यार्थिनीची हत्या करणाऱ्या तरुणाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना मोखाडा येथे घडली आहे. प्रभाकर वाघरे (वय २२ वर्षे) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. या धक्कादायक घटनेने पालघर हादरले आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, पालघर जिल्ह्यातील मोखाड्यातील गभालपाडा आश्रमशाळेत इयत्ता बारावीत शिकणारी अर्चना उदार ही विद्यार्थीनी महाविद्यालयात गेली होती. दुपारच्या वेळेस जेवणासाठी महाविद्यालयातून आश्रमशाळेच्या दिशेने परत जात असताना मागून पिशवीत कोयता घेऊन आलेल्या प्रभाकर वाघरेने तिच्यावर जीवघेणा हल्ला केला. त्याने कोयत्याने गळा चिरून अर्चनाची हत्या केली. अर्चनासोबत असलेल्या तिच्या मैत्रिणींनी आरडाओरड सुरू केल्यानंतर आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला.

घटनेची माहिती मिळताच मोखाडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेत आरोपीचा शोध सुरू केला. फरार असलेल्या प्रभाकर वाघरेचा पोलिसांमार्फत शोध सुरू असतानाच त्याचा मृतदेह तुळ्याचापाडा येथील धरण परिसरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. तुळ्याचापाडा धरणावर पाणी सोडण्यात येणाऱ्या लोखंडी गेटला रात्रीच्या सुमारास गळफास लावून त्याने आत्महत्या केली.

प्रभाकर वाघरेच्या कुटुंबियांनी अर्चना उदारला लग्नासाठी मागणी घातली होती. मात्र उदार कुटुंबीयांनी ती अमान्य करत अर्चनाचा विवाह अन्य ठिकाणी निश्चित केला. याचा राग मनात धरून प्रभाकर वाघरेने अर्चनाची हत्या केल्याची शक्यता मोखाडा पोलिसांनी व्यक्त केली. या प्रकरणी पुढील तपास मोखाडा पोलीस करीत आहे.

Web Title: young man absconded after killing the young woman He ended his life 

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here