माझ्या पतीने वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून आयुष्य संपवलं, API च्या पत्नीचा गंभीर आरोप
Solapur Crime: नांदेड पोलीस दलातील एपीआय आनंद मळाले यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या (Suicide) केल्याची घटना. सोलापूर पोलीस दलात व नांदेड पोलीस दलात खळबळ उडाली.
सोलापूर: वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून सोलापूरच्या कुमठा नाका येथील सोसायटीत नांदेड पोलीस दलातील एपीआय आनंद मळाले यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे सोलापूर पोलीस दलात व नांदेड पोलीस दलात खळबळ उडाली आहे. आनंद यांच्या पत्नी वंदना मळाले यांनी नांदेड पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी त्रास दिला म्हणून माझ्या पतीने टोकाचं पाऊल उचलले आहे.
(Suicide Note) आत्महत्या करण्यापूर्वी पतीने व्हॉटसअॅपवर भावनिक मेसेज पाठवला होता.”चिमू, पिल्लू मला माफ करा. मी तुमच्यासाठी काही एक भरीव योगदान दिले नाही. माझ्या पश्चात तुम्ही दोघे जीवाचे रान करुन चांगल्या भविष्यासाठी आटोकाट प्रयत्न कराल. पिल्लूला माझे शुभ आशीर्वाद व त्याच्या उज्वल भविष्यासाठी लाख लाख शुभेच्छा. माझ्या पँटच्या डाव्या खिशात चिठ्ठी आहे”, असा मेसेज आनंद मळाले यांनी पत्नीला पाठवला होता. हा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी हळहळ व्यक्त केली.
सोलापूर शासकीय रुग्णालयात पत्नी वंदना मळाले, मुलगा व सावत्र आईने हंबरडा फोडला आहे. त्यांचा टाहो पाहुन शासकीय रुग्णालयातील सर्वांचे डोळे पाणावले. आनंद मळाले यांच्या मातोश्री रडून रडून बेशुद्ध पडल्या. सावत्र आई जरी असल्या तरी त्यांनी सख्ख्या मुलाप्रमाणे आनंद मळाले यांचं संगोपन केलं होतं. जिवाचं रान करून पोराला मोठं केलं, खूप हुशार मुलगा होता,असा कसा सोडून गेला, तुला टेन्शन होत तर मला सांगायचं होत,अशा शब्दांत आईच रडणं पाहून ,शासकीय रुग्णालयात दुःखाचं सावट पसरले होते.
पत्नी वंदना मळाले यांनी माध्यमांना माहिती देताना सांगितले, माझ्या पतीला वरिष्ठांकडून खूप त्रास दिला जात होता. गुन्ह्याच्या तपासाकामी वरिष्ठ पोलीस अधिकारी दबाव आणत होते,असा गंभीर आरोप मृत एपीआयच्या पत्नीने केला आहे. त्या वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात आनंद प्रकाश मळाले यांच्या मृतदेहावर पोस्टमार्टमची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सोलापूर पोलीस दलातील पोलीस अधिकारी घटनास्थळी व शासकीय रुग्णालयात तळ ठोकून बसले आहेत.
Web Title: Police force API Anand Malale committed suicide by shooting himself
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App