Home Accident News माळशेज घाटात भरधाव ट्रकची एसटी बसला धडक; १५ ते २० प्रवासी जखमी

माळशेज घाटात भरधाव ट्रकची एसटी बसला धडक; १५ ते २० प्रवासी जखमी

Malshej Ghat Bus Accident News: कल्याण येथून शिरोळीकडे जाणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसला शुक्रवारी रात्रीच्या सुमारास भीषण अपघात झाल्याची घटना.

speeding truck collided with an ST bus in Malshej Ghat Accident

माळशेज: कल्याण येथून शिरोळीकडे जाणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसला शुक्रवारी रात्रीच्या सुमारास भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. कल्याण नगर महामार्गावरील माळशेज घाटात समोरुन भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकने बसला जोरदार धडक दिली. सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र, बसमधील १५ ते २० प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. बसमधील जखमी प्रवाशांना उपचारासाठी आळेफाटा,ओतुर, नारायणगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पोलिसांकडून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

याबाबत अधिक माहिती अशी की,  अपघातग्रस्त बस कल्याण येथून शिरोळीच्या दिशेने निघाली होती. या बसमधून २० ते २५ प्रवासी प्रवास करीत होते. रात्री ११ वाजेच्या सुमारास बस कल्याण नगर महामार्गावर खुबीजवळ आली असता, समोरुन भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकने बसला जोरदार धडक दिली.

ही धडक इतकी भीषण होती, की अपघातानंतर ट्रक रस्त्यावरच उलटला. या भीषण अपघातात बसमधील १५ ते २० प्रवासी गंभीर जखमी झाले. ट्रक उलटल्याने चालक देखील गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे.

रात्रीच्या सुमारास अपघात झाल्याने स्थानिक नागरिक आणि प्रवाशांच्या मदतीने मदत कार्य करण्यात आले. अपघातानंतर माळेशेज घाटात मोठी वाहतुक कोंडी झाली होती. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली.

Web Title: speeding truck collided with an ST bus in Malshej Ghat Accident

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here