पावनगडावरून प्रेमीयुगलाने घेतली उडी, ३० फूट खोल दरीत उडी अन…
प्रेमीयुगुलाने शुक्रवारी उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न, लग्नाला घरच्यांचा विरोध; दोघेही गंभीर जखमी : पोलिसांचे रेस्क्यू ऑपरेशन
कोल्हापूर: नातेवाइकांकडून लग्नाला होत असलेल्या विरोधातून आलेल्या नैराश्यापोटी पन्हाळा-पावनगडाच्या तटबंदीवरून प्रेमीयुगुलाने शुक्रवारी उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये दोघेही गंभीर जखमी झाले आहेत.
संकेत नामदेव लाड (वय २२) व वैभवी उदय पाटील (वय २१, रा. राशिवडे बुद्रुक, ता. राधानगरी) अशी जखमींची नावे आहेत.
संकेत याने मोबाईलवरून मित्रांना ‘आमच्या प्रेम प्रकरणास घरच्यांचा विरोध आहे. आम्ही पावनगडाच्या तटबंदीवरून उडी घेऊन आत्महत्या करून जीवन संपवत आहे. घरच्यांना सांगा, की तुम्ही सुखी रहा,’ असे सांगीतले. त्या वेळी मित्रांनी त्या दोघांना ‘असे कृत्य करू नको, आम्ही येतो काहीतरी तोडगा काढू’ असे सांगून त्यांना थांबवले. | पन्हाळा (कोल्हापूर) प्रतिनिधी त्याचे मित्र तत्काळ पन्हाळ्याकडे रवाना झाले. ते दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास पोहोचले. मित्र येत असल्याचे पाहून संकेत व वैभवीने एकमेकांना घट्ट पकडून तटबंदीवरून ३० फूट खोल दरीत उडी घेतली. त्याच्या मित्रांनी स्थानिकांसह येथे असलेल्या बंदोबस्तातील पोलिसांनी रेस्क्यू ऑपरेशन करत दोघांना रुग्णलायत दाखल केले. दोघेही गंभीररीत्या जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब मलगुंडे, पोलीस नाईक सचिन पाटील, पोलीस कॉन्स्टेबल विकास केर्लेकर, गणेश पाटील- वायदंडे, जाधवर, मर्दाने व मित्र आणि स्थानिक लोकांनी रेस्क्यू ऑपरेशनमध्ये सहभाग घेतला.
Web Title: Lovers jump from Pawangad, jump into 30 feet deep gorge
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App