Home Suicide News धक्कादायक खुलासा, चिट्ठी लिहून युवकाची आत्महत्या

धक्कादायक खुलासा, चिट्ठी लिहून युवकाची आत्महत्या

Young man commits suicide by writing a note

श्रीगोंदा: श्रीगोंदा तालुक्यातील येवती या गावात धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नातेवाईक यांच्या जाचाला व आर्थिक त्रासाला कंटाळून एका ४० वर्षीय युवकाने घराजवळील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

गौतम भानुदास आढाव असे या आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. याप्रकरणी रामदास पोपट आढाव, दादा पोपट आढाव, पोपट सखाराम आढाव, जिजाबाई पोपट आढाव यांच्याविरुद्ध बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत सविस्तरपणे माहिती अशी की, श्रीगोंदा तालुक्यातील येवती येथे गौतम भानुदास आढाव यांची दीड एकर शेतील भावकीतील लोकांनी फसवणूक करून खरेदी केली. घेतलेली जमीन माघारी परत देण्यासाठी बैठकीत त्यांनी २१ लाख रुपये १ महिन्यात द्या नाहीतर तुम्हाला जमीन परत मिळणार नाही. तसेच उरलेली जमीन पण आम्हालाच द्या. असे म्हणून वेळोवेळी त्रास दिल्याने याच त्रासाला कंटाळून तसेच आपली जमीन पुन्हा आपल्याला मिळणार नाही या विचारातून काल सकाळी राहत्या घराच्या पाठीमागे झाडाला फाशी घेऊन आपले जीवन संपविले.

येथे पहा: हार्दिक पांड्या टॉप सिक्सेस, हेलिकॉप्टर शॉट 6666

आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी चिठ्ठी लिहून मोबाईलवर मेसेज टाकत रामदास पोपट आढाव, दादा पोपट आढाव, पोपट सखाराम आढाव, जिजाबाई पोपट आढाव हे आत्महत्यास कारणीभूत असल्याचे कळविले. याप्रकरणी मयतची पत्नी छाया आढाव यांनी फिर्याद दाखल केली असून वरील चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Web Title: Young man commits suicide by writing a note

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here