Home Accident News Accident: संगमनेर तालुक्यात द बर्निंग कार थरार, दोघे बचावले

Accident: संगमनेर तालुक्यात द बर्निंग कार थरार, दोघे बचावले

Sangamner Accident the burning car 

संगमनेर | Accident: संगमनेर तालुक्यातील शिबलापूर संगमनेर मार्गावर द बर्निग कारचा थरार पाहायला मिळाला, गुरुवारी शिबलापूर ते गोसावी फाटा दरम्यान फोर्ड कंपनीच्या चार चाकी वाहनाला अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. या अपघातात दोघे जण बचावले आहेत.

संगमनेर तालुक्यातील शिबलापूर ते गोसावी फाट्यादरम्यान चार चाकी फोर्ड कंपनीच्या (एम.एच. ०५ ए.जे. ७७१४) सुनील मांढरे यांच्या मालकीची गाडीला गुरुवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. यावेळी भर रस्त्यात चालत्या गाडीने पेट घेतल्यामुळे ही गाडी आगीत पूर्णपणे जळून खाक झाली. मात्र प्रसंगवधान राखत आश्वी खुर्दचे उपसरपंच सुनील तुकाराम मांढरे आणि त्याचे मित्र उमेश गाडे वेळीच त्यातून बाहेर पडल्याने ते दोघेही सुखरूप बचावले आहेत.

येथे पहा: हार्दिक पांड्या टॉप सिक्सेस, हेलिकॉप्टर शॉट 6666

दरम्यान या घटनेची माहिती मिळताच संगमनेर नगरपरिषदेच्या अग्निशामक बंबाने घटनास्थळी दाखल होऊन आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला मात्र तोपर्यंत या दुर्घटनेत गाडी पूर्ण जळून खाक झाली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

Web Title: Sangamner Accident the burning car 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here