Home Accident News Accident: अकोलेत रेशनच्या धान्याचा ट्रक पलटी होऊन अपघात

Accident: अकोलेत रेशनच्या धान्याचा ट्रक पलटी होऊन अपघात

Accident due to overturning of ration grain truck in Akole

अकोले | Accident: अकोले तालुक्यातील सावरकुटे येथे रेशनचे धान्य घेऊन जाणारा ट्रक पलटी होऊन अपघात झाल्याची घटना घडली आहे. गुरुवारी दुपारी ही घटना घडली. यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

अकोले तालुक्यातील आंबीत धामणवन सावरकुटे या भागातील आदिवासी जनतेचे ऑगस्ट महिन्याचे मोफत वाटपाचे धान्य या ट्रकमधून पोहोच केले जात होते. मात्र सावरकुटे गावाजवळ हा ट्रक आला असता पलटी झाला. या ट्रकमध्ये गहू तांदळाच्या सुमारे तीनशे गोण्या होत्या. मोफत धान्य वितरण योजनेतील धान्य हा ट्रक घेऊन जात होता. पुरवठा विभागाला ही माहिती मिळताच पर्यायी व्यवस्था करून हे धान्य दुसऱ्या गाडीत पाठविण्यात आले. या दुर्घटनेत सुदैवाने कोणतेही जीवितहानी झाली नाही मात्र ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे.

येथे पहा: हार्दिक पांड्या टॉप सिक्सेस, हेलिकॉप्टर शॉट 6666

Web Title: Accident due to overturning of ration grain truck in Akole

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here