Home अहमदनगर १० लाखाच्या खंडणीसाठी भाडेकरूनेच केला घरमालकाच्या अपहरणाचा प्रयत्न मात्र

१० लाखाच्या खंडणीसाठी भाडेकरूनेच केला घरमालकाच्या अपहरणाचा प्रयत्न मात्र

Crime News tenant tried to kidnap the landlord for a ransom of Rs 10 lakh

जामखेड | Crime: जामखेडमध्ये १० लाख रुपयांच्या खंडणीसाठी भाडेकरूनेच घरमालकाचे मध्यरात्री घरात घुसून अपहरण केल्याची घटना घडली आहे मात्र आरोपींचा हा प्रयत्न फसला असून जामखेड पोलिसांनी दोन तासांच्या आत आरोपींना गजाआड केले आहे. दोन आरोपींना अटक केली असून एक मात्र फरार झाला आहे. आरोपींना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी घरमालक कृष्णा अशोक साळुंके (वय २३ वर्ष धंदा शिक्षण रा. बीड रोड जामखेड) हा दि. १९ रोजी रात्री आपल्या घरी झोपलेले असताना  मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास त्याच्या घराचा दरवाजा कोणीतरी अज्ञात दोन व्यक्तींनी वाजवला. या वेळी दिड वर्षापासुन फिर्यादीच्या घरातील रुम भाड्याने राहणाऱ्या आरोपी योगेश शहादेव शिंदे याने गेटचा दरवाजा उघडला. यानंतर दोन आरोपींनी माझ्या घरात येऊन माझे हात पाय बांधुन, तोंडाला रूमाल बांधुन व गळ्याला चाकु लावून (एम एच १२ एफ के ३८९७) या चारचाकी वाहनात मागच्या सिटवर बसवुन म्हणाले की, कृष्णा याने १० लाख रूपये दिले नाही तर त्यास ठार मारून टाकू. हे सर्व फिर्यादी कृष्णा याने गाडीत ऐकले होते.

यानंतर फिर्यादी यांनी  कसेबसे गाडीतुन आपली सुटका करुन घेत बीड रोडवरील आपल्या घराजवळ आरडाओरड केली. मात्र तरी देखील भाड्याने रहात आसलेल्या आरोपी योगेश शिंदे यांने फिर्यादी घरमालकास दम दिला की, तु गाडीत येऊन बस नाहीतर तुझ्या आईला ठार मारु. या नंतर शेजारी रहाणारे लोक धावत बाहेर आले. त्यामुळे आरोपी योगेश शिंदे (रा. सौताडा ता. पाटोदा जिल्हा बीड) व त्याचे दोन साथीदार घटनास्थळाहुन पळुन गेले. या प्रकरणी फिर्यादी कृष्णा साळुंके याने दिलेल्या फिर्यादीवरून  तीन आरोपींविरोधात जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत दोन आरोपींना लपुन बसलेल्या नागेश शाळेच्या पाठीमागील भागातील एका घरातुन अटक करण्यात आली आहे. 

Web Title: Crime News tenant tried to kidnap the landlord for a ransom of Rs 10 lakh

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here