Home जळगाव स्टेटसवर स्वत:लाच श्रद्धांजली; मग भावाला फोन, त्यानंतर तरुणाने टोकाचं पाऊल उचललं

स्टेटसवर स्वत:लाच श्रद्धांजली; मग भावाला फोन, त्यानंतर तरुणाने टोकाचं पाऊल उचललं

Jalgaon Suicide News:  तरुणाने आपल्या व्हॉट्सअॅपवर स्टेटसवर स्वत:लाच भावपूर्ण श्रद्धांजली देत गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली.

young man committed suicide by hanging himself while giving an emotional tribute

जळगाव: जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात नेरी या गावात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणाने आपल्या व्हॉट्सअॅपवर स्टेटसवर स्वत:लाच भावपूर्ण श्रद्धांजली देत गळफास लावून आत्महत्या (Suicide) केल्याची घटना घडली आहे. रविवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास ही घटना घडली. ऋषिकेश दिलीप खोडपे उर्फ गोलू (वय २५) असं या मयत तरुणाचं नाव आहे. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलं नाही.

नेरी बुद्रुक येथे ऋषीकेश आपल्या कुटुंबियांसह राहत होता. शनिवारी रात्री ९ वाजेच्या च्या सुमारास त्याने आपल्या व्हॉट्सअॅप स्टेटसवर मूड ऑफ असे स्टेटस ठेवले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी रविवारी आपल्या व्हॉट्सअॅप स्टेटसवर भावपूर्ण श्रद्धांजली असे स्टेटस ठेवले. त्यानंतर त्याने त्याचा चुलत भाऊ प्रदीप खोडपेला फोन केला. “मी तुला सोडून जात आहे”. असं तो फोनवर म्हणाला. भाऊ प्रदीपने ऋषिकेशला विचारले “तू कुठे आहे”. तर त्याने सांगितले, “मी गोरख बाबांच्या शेतात आहे”.

त्यानंतर त्या ठिकाणी गेले असता त्यांना ऋषिकेश हा शेतातील झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. घटनेची माहिती मिळाल्यावर गावकऱ्यांनी घटनास्थळी गर्दी केली. जामनेर पोलिसांनी ऋषिकेश यास खाली उतरवून जामनेर शहरातील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ऋषिकेश यास मयत घोषित केले.

Business Idea | शेतीसंबंधित हा व्यवसाय सुरु करून दर दिवस हजारोंची कमाई करण्याची संधी

शनिवारी रात्री गावात असलेल्या सप्ताहाच्या धार्मिक कार्यक्रमात ऋषिकेश यानी सहभाग घेतला होता. त्यानंतर प्रदीप खोडपेला फोन करून सांगितले की, “मी तुला सोडून जात आहे”, असा फोन करुन शेतात गळफास घेतला. ऋषिकेशचा दोन बहिणी, आई आणि वडील असा परिवार आहे. या घटनेने गावात शोककळा पसरली आहे. या प्रकरणी जामनेर पोलीस स्टेशनमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीवरून जामनेर पोलीस स्टेशनमध्ये अकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस नाईक अतुल पवार करत आहेत.

Web Title: young man committed suicide by hanging himself while giving an emotional tribute

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here