Home अहमदनगर शिर्डीत ऐन गांधी जयंती दिनी तरुणाने बसमध्ये संपवले जीवन

शिर्डीत ऐन गांधी जयंती दिनी तरुणाने बसमध्ये संपवले जीवन

Ahmednagar | Shirdi News: शिर्डी पोलीस स्टेशनच्या आवारात जमा करण्यात आलेल्या एका जुनाट बसमध्ये तरुणाने आत्महत्या (Suicide) केल्याची घटना.

Young man ended his life in a bus on Ain Gandhi Jayanti in Shirdi Suicide Case

शिर्डी: शिर्डी पोलीस स्टेशनच्या आवारात जमा करण्यात आलेल्या एका जुनाट बसमध्ये आज ऐन गांधी जयंती दिनी सोमवारी (दी.२) गळफास घेतलेल्या एका तरुणांचा मृतदेह आढळून आला आहे. आज पहाटे आत्महत्या केल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.  

तौफिक मुसा इनामदार (वय ३५) असे या तरुणाचे नाव आहे, तो कोळपेवाडी येथील रहिवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले. परिवहन विभागाने जप्त केलेली वाहने पोलीस ठाण्याच्या आवारात लावण्यात आलेली आहेत. यातच पोलीस स्टेशन आवारात संस्थान प्रसादालयाकडे जाणाऱ्या मार्गावर लावण्यात आलेल्या एका भंगार अवस्थेत असलेल्या बस मध्ये ही घटना घडली. पोलिसांनी बसच्या केबिनचा आतील दरवाजा तोडून मृतदेह बाहेर काढण्यात आला. आज सोमवारी पहाटे ही घटना घडली असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

Web Title: Young man ended his life in a bus on Ain Gandhi Jayanti in Shirdi Suicide Case

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here