Home बुलढाणा भरधाव ट्रक झोपडीत घुसला, १० मजुरांना चिरडलं, चार जण जागीच ठार

भरधाव ट्रक झोपडीत घुसला, १० मजुरांना चिरडलं, चार जण जागीच ठार

नांदुरा-मलकापूर मार्गावर भीषण अपघात (Accident), ट्रकने झोपडीत झोपलेल्या १० मजुरांना चिरडलं, या अपघातात चार मजूर जागीच ठार झाले.

speeding truck rammed into the hut, crushing 10 laborers, killing four Accident

बुलढाणा: बुलढाण्यात नांदुरा-मलकापूर मार्गावर भीषण अपघाताची घटना घडली आहे. चालकाचं नियंत्रण सुटल्याने एक भरधाव आयशर ट्रक रस्त्यालगतच्या झोपडीत घुसला. ट्रकने झोपडीत झोपलेल्या १० मजुरांना चिरडलं असून या अपघातात चार मजूर जागीच ठार झाले आहेत. तर ६ मजूर गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर मलकापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या सहा जखमींपैकी दोघांची परिस्थिती अत्यंत चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे.

हे सर्व मजूर महामार्गाच्या कामासाठी आले होते. रस्त्यालगतच त्यांची झोपडी होती. रात्री हे मजूर गाढ झोपेत असताना एक भरधाव ट्रक त्यांच्या झोपडीत घुसला. बुलढाण्यातल्या नांदुरा तालुक्यातील वडनेर येथील ही घटना आहे. पोलिसांनी या अपघाताची चौकशी सुरू केली आहे.

महामार्गाचं काम करत असलेले मजूर रात्री त्यांचं काम संपवून रस्त्यालगतच्या झोपडीत आराम करत होते. त्याच वेळी या रस्त्यावरून जाणाऱ्या एका भरधाव ट्रकवरील चालकाचं नियंत्रण सुटलं आणि ट्रक त्या झोपडीत घुसला. या अपघातात चार मजूर जागीच ठार झाले तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. झी २४ तास वाहिनीने यासंबंधीचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

दिवस-रात्र या मार्गावरून वाहनांची ये-जा सुरूच असते. या मार्गावर प्रामुख्याने ट्रकची मोठ्या प्रमाणात रेलचेल सुरू असते. या रस्त्यालगत मोठ्या प्रमाणात झोपड्या आहेत. रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालं असल्यामुळे अपघातांचं प्रमाण वाढलं असल्याचं स्थानिकांनी म्हटलं आहे.

अपघातात निधन झालेले मजूर हे चिखलदऱ्यातून नांदुऱ्यात रस्त्याच्या कामासाठी आले होते. प्रकाश बाबू जांभेकर (२६), पंकज तुळशीराम जांभेकर (२६), अभिषेक रमेश जांभेकर (१८) अशी अपघातात मृत्यू झालेल्या तीन मजुरांची नावं आहेत. चौथ्या मजुराचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. त्याचं नाव अद्याप कळू शकलं नाही.

Web Title: speeding truck rammed into the hut, crushing 10 laborers, killing four Accident

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here