धक्कादायक! लग्नात वरातीच्या वादातून युवकाचा खून करून मृतदेह फेकला कालव्यात- Murder
पुणे | Pune Crime: लग्नाच्या वरातीत दारू पिऊन भांडणे केल्याच्या वादातून कडधे ता. खेड येथे खून (murder) झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शंकर शांताराम नाईकडे वय ४० रा. कडधे ता. खेड असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे.
कडधे गावात मंगळवारी एका लग्नाची वरात होती. त्यात शंकर नाईकडे आला व त्याने काही तरुणांकडे दारू पिण्याची मागणी केली. नंतर नाचणाऱ्या काही युवकांमध्ये धाकाकाबुक्की करू लागला. त्यावर वादविवादात बाचाबाची भांडणे झाली. सहा युवकांनी एकत्रित बाजूला नेले. अंधारात त्याच्यावर हल्ला चढविला. दगड विटांनी मारहाण केली. त्याचा मृतदेह एका वाहनात घालून चासकमान धरणाच्या डाव्या पाण्यात फेकून दिला अशी माहिती खेडचे पोलीस निरीक्षक सतीश गुरव यांनी दिली.
Web Title: young man should be murder and his body dumped in a canal