Home पुणे Rape Case | गोड गोड बोलून नात्यातील तरुणीवर बलात्कार

Rape Case | गोड गोड बोलून नात्यातील तरुणीवर बलात्कार

Rape of a young woman in a relationship with sweet talk

Pune Crime: लग्नाचे आमिष दाखवून गोड गोड बोलून नात्यातील एका तरुणीवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात २४ वर्षीय तरुणावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, सदर प्रकार फेब्रुवारी २०२२ आणि मार्च २०२२ मध्ये दिघी परिसरात घडला.

याबाबत २२ वर्षीय पिडीत तरुणीने दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी २४ वर्षाच्या तरुणावर गुन्हा दाखल केला असून पोलीस अधिक तपास करीत आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी हा फिर्यादी पिडीत तरुणीचा नात्यातील आहे. त्याने फिर्यादी तरुणीसोबत प्रेमाच्या गोष्टी करीत लग्नाचे आमिष दाखवले व फिर्यादीला मोशी येथील एका लॉजवर नेऊन बलात्कार केला. तसेच कोणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. असे फिर्यादीत म्हंटले आहे. अधिक तपास पोलीस उप निरीक्षक ज्ञानेश्वर दळवी करीत आहे.

Web Title: Rape of a young woman in a relationship with sweet talk

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here