Home क्राईम तरुणीने तरुणाला लॉजवर घेऊन गेली अन घडले असे धक्कादायक की…

तरुणीने तरुणाला लॉजवर घेऊन गेली अन घडले असे धक्कादायक की…

अत्याचार (abuse) केल्याची धमकी देत खंडणी मागितली. तरुणीचा डाव फसला. दोघांवर गुन्हा.

young woman abuse took the young man to the lodge and what happened was shocking

सोलापूर: बार्शी तालुक्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली. लॉजवरून नेऊन अत्याचार केला असल्याची धमकी देत एका तरुणीने तरुणाकडे २५ हजारांची खंडणी मागितली. ही धक्कादायक घटना २७ ऑक्टोबर रोजी दुपारी बारा ते एक वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी तरुणाने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी तरुणीसह एकाला ताब्यात घेतलं आहे.

नितीन चंद्रकांत शिंदे(वय २८ रा.ढोराळे,ता.बार्शी) आणि ती तरुणी अशी गुन्हा (Crime News) दाखल झालेल्यांची नावे आहेत. दोघांनाही पोलिसांनी न्यायालयात हजर केलं असता, न्यायालयाने त्यांना ५ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

प्राप्त माहितीनुसार, तडवळे यावली येथे ५ ऑक्टोबर रोजी भगवती देवीची यात्रा सुरू असताना नगर जिल्ह्यातील काही तरुणी येथे नाचण्यासाठी आल्या होत्या. त्यावेळी एका तरुणीने पीडित तरुणाचा मोबाईल क्रमांक घेतला होता. त्यानंतर तरुणीने तरुणाला गुरुवारी (ता.२७) रोजी सकाळी 10 वाजता फोन केला.

फोनवर तरुणीने तू कोठे आहेस? असे विचारुन मी बार्शी येथे आले असून तू शिवाजी कॉलेजजवळ ये असे तक्रारदार तरुणाला सांगितले. दुपारी बारा वाजता तक्रारदार तरुण तेथे गेला असता, पुन्हा तरुणीने फोन करुन मी शिवाजी चौकातील कुर्डूवाडी रोडवर उभी असल्याचे सांगितले. तेथे भेट झाल्यानंतर तरुणीने निलेशला चहा घेण्याच्या बहाण्याने एका लॉजवर नेले.

लॉजवर गेल्यानंतर तरुणीने तक्रारदार तरुणाचा अर्धनग्न (Porn Photo) फोटो काढला. त्यानंतर फोटो व्हायरल करण्याची धमकी देत त्याच्याकडे 25 हजार रुपयांच्या खंडणीची मागणी केली. पैसे दे अन्यथा माझ्यावर अत्याचार केल्याचे ओरडून सांगेन अशी धमकी सुद्धा तरुणाला दिली.

तरुणीच्या या कृत्यामुळे तक्रारदार तरुण प्रचंड घाबरला. आपल्याकडे पैसे नसल्याचे त्याने तरुणीला सांगितले. त्यावर आत्ता जवळ जेवढे आहेत तेवढे पैसे दे अशी तरुणीने केली. तेव्हा तक्रारदाराने तरुणीला फोन पे वरुन 500 रुपये पाठवले.

त्याचवेळी लॉजवर पोलीस आले आणि त्यांनी तरुणीला पळवून आणल्याचे सांगत तरुणीसह तरुणाला अटक केली. पोलिसांनी दोघांनाही पोलीस ठाण्यात नेले असता, तक्रारदार तरुणाने आपल्यासोबत घडलेला संपूर्ण प्रकार पोलिसांना सांगितला. तरुणाच्या तक्रारीवरून पोलिसांनी तरुणीसह तिच्या साथीदारावर गुन्हा (Crime) दाखल केला. याप्रकरणी अधिक तपास पोलीस करीत आहे.

Web Title: young woman abuse took the young man to the lodge and what happened was shocking

See Latest Marathi NewsAhmednagar News and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here