Home नाशिक कसारा घाटात कंटेनर दरीत कोसळला, कंटेनरचालक अडकला अन…

कसारा घाटात कंटेनर दरीत कोसळला, कंटेनरचालक अडकला अन…

कसारा घाटात कंटेनर दरीत कोसळला या अपघातात (Accident) कंटेनरचालक कंटेनरखाली अडकला, वाचविण्यात आपत्ती व्यवस्थापनाच्या पथकाला यश.

Accident container fell into the valley at Kasara Ghat

इगतपुरी: मुंबई आग्रा महामार्गावरील नवीन कसारा घाटातील ब्रेक फेल पॉइंटजवळ शनिवारी (ता.२९) सकाळच्या सुमारास सिमेंटच्या पेवरब्लॉकने भरलेला कंटेनर (MH 48 HF 1513) चालकाचे नियंत्रण सुटल्याने संरक्षक कठडा तोडून थेट ५० फूट दरीत जाऊन कोसळल्याची घटना घडली. या अपघातात कंटेनरचालक कंटेनरखाली अडकला होता. त्याला वाचविण्यात आपत्ती व्यवस्थापनाच्या पथकाला यश आले.

या अपघाताची (Accident) माहिती मिळताच महामार्ग पोलिस केंद्राचे सहायक पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे यांनी कसारा येथील आपत्ती व्यवस्थापन टीमचे शाम धुमाळ, दत्ता वाताडे, स्वप्नील कलंत्री, विनोद आयरे, अक्षय राठोड, बाळू मांगे, जस्स्सी भाई यांना घटनास्थळी महामार्ग पोलिसांच्या मदतीने या टीमने मदत कार्य सुरु केले. ट्रकच्या केबिनमध्ये अडकलेल्या चालकास सुखरूप बाहेर काढण्याचे एक प्रकारे आवाहन होते.

नियोजन करून क्रेनचे बेल्ट ट्रकच्या काही पार्टला लावून थोड्या प्रमाणात वर घेतले. दोन सदस्य व एक टेम्पो चालक केबिनमधे दाखल होऊन जखमी चालकास बाहेर काढण्याचे काम सुरु केले. एक तासाच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर गभीररित्या अडकलेल्या जखमी चालकास सुखरूप बाहेर काढण्यात या टीमला यश आले.

कसारा आणि रूट पेट्रोलिंग टीमच्या कर्मचाऱ्यांनी एक तासाच्या अथक प्रयत्नानंतर ट्रक चालकाला क्रेंनच्या सहाय्याने बाहेर काढून पुढील उपचारासाठी इगतपुरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. या चालकाला बाहेर काढण्यासाठी मदतीसाठी मनुष्यबळ कमी असताना देखील अनेक नागरिक मदत करण्याऐवजी मोबाईलवर शूटिंग करण्यात मग्न होते अशी खंत आपत्ती व्यवस्थापन टीमच्या शाम धुमाळ यांनी व्यक्त केली.

Web Title: Accident container fell into the valley at Kasara Ghat

See Latest Marathi NewsAhmednagar News and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here