Home अहमदनगर अहमदनगर: महाविद्यालयात तरुणीला डांबले आणि मारहाण, सहा जणांवर गुन्हा

अहमदनगर: महाविद्यालयात तरुणीला डांबले आणि मारहाण, सहा जणांवर गुन्हा

Breaking News | Ahmednagar Crime: कॉलेज सुटल्यानंतर विसरलेले स्कार्फ आणण्यासाठी गेलेल्या तरुणीला दगडाने मारहाण करत क्लासरूममध्ये डांबण्यात आले.

young woman was attacked and beaten up in the college, a crime against six people

अहमदनगर : कॉलेज सुटल्यानंतर विसरलेले स्कार्फ आणण्यासाठी गेलेल्या तरुणीला दगडाने मारहाण करत क्लासरूममध्ये डांबण्यात आले. तिने हनुवटीने कसाबसा मोबाईल उचलला आणि तिची नातेवाइकांनी सुटका केली. ही घटना मंगळवारी (दि. १९) सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास शहरातील एका महाविद्यालयात घडली. याप्रकरणी सहा अज्ञातांविरोधात तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत १९ वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे. ही तरुणी शहरातील एका महाविद्यालयात शिक्षण घेते. मंगळवारी प्रॅक्टिकल असल्याने ती सकाळी आठ वाजता कॉलेजला गेली. तिचे प्रॅक्टिकल तीन वाजता संपले. त्यानंतर तिने मैत्रीणींसोबत स्पूर्ण केले. साडेचार वाजेच्या सुमारास ती मैत्रीणींसह घरी जाण्यासाठी निघाली. मैत्रीणींची बस आली. त्या निघून गेल्या. ती एकटी मागे राहिली. स्कार्फ क्लासरुममध्ये विसरल्याचे तिच्या लक्षात आले. ती स्कार्फ आणण्यासाठी पुन्हा महाविद्यालयातील क्लासरुममध्ये गेली. स्कार्फ घेऊन परत येत असताना तोंडाला काळे मास्क असलेले सहा जण समोरून आले. यातील एकाने मुलीला अडवून दगडाने मारले. इतरांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करत तरुणीला  क्लासरुममध्ये नेले. तिथे तिचे हात स्कार्फने बांधले. यावेळी झालेल्या मारहाणीमुळे मुलगी बेशुद्ध पडली. तिला शुद्ध आली. तेव्हा तिचे हात बांधलेले होते व फोन बाजूला पडलेला होता. त्यावर काकांचा फोन येत होता. तिने हनुवटीने कसाबसा फोन उचलला व घडलेला प्रकार सांगितला. नातेवाइकांनी महाविद्यालयात येऊन तिची सुटका केली. तिला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, जबाबावरून तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सचिन रणशेवरे करत आहेत.

Web Title: young woman was attacked and beaten up in the college, a crime against six people

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here