नीट परीक्षा उत्तीर्ण झालेल्या तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या
Breaking News | Jalgaon Suicide: आई-वडील कामावर गेलेले असताना घरी एकटीच असलेल्या तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना.
जळगाव: आई-वडील कामावर गेलेले असताना घरी एकटीच असलेल्या चंदा महेश राठोड (वय १९, रा. समर्थ कॉलनी) या तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवार दि.२३ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास तिची लहान बहीण घरी आल्यानंतर उघडीस आली.
काही महिन्यांपूर्वीच ही तरुणीनी नीट परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे तिच्या नातेवाईकांनी सांगितले. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद તુ करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील समर्थ कॉलनीत महेश राठोड हे पत्नी, मुलगा व तीन मुलींसह वास्तव्यास आहे. त्यातील मोठी मुलगी चंदा ही काही महिन्यांपूर्वी नीट परीक्षा उत्तीर्ण झाली. त्यानंतर ती खंडवा येथे नातेवाईकांकडे गेलेली होती. महिनाभरापूर्वीच ती जळगावात आली होती. सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे तिचे आई वडील कामावर गेलेले असल्यामुळे चंदा ही घरी एकटीच होती. घरी कोणी नसताना दुपारी चंदाने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविली.
Web Title: young woman who passed the examination committed suicide
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study