Home अहिल्यानगर अहिल्यानगर: गुंगीकारक नशेच्या गोळ्यांची विक्री; तरुणाला केली अटक

अहिल्यानगर: गुंगीकारक नशेच्या गोळ्यांची विक्री; तरुणाला केली अटक

Breaking News | Ahilyanagar Crime: विनापरवाना अवैधरीत्या गुंगीकारक नशा आणणाऱ्या नायट्राझेपमच्या गोळ्या विकणाऱ्या भुसावळच्या तरुणास श्रीरामपूर बस स्टॅण्डवर पकडले.

Youth arrested for selling narcotic pills

श्रीरामपूर : विनापरवाना अवैधरीत्या गुंगीकारक नशा आणणाऱ्या नायट्राझेपमच्या गोळ्या विकणाऱ्या भुसावळच्या तरुणास श्रीरामपूर बस स्टॅण्डवर पकडले. पोलिसांनी त्याच्याकडून २४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. याप्रकरणी शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

श्रीरामपूर बस स्थानक येथे एक संशयित इसम हा गुंगीकारक नशेच्या गोळ्या विक्री करण्याकरिता आलेला असल्याची माहिती निरीक्षक नितीन देशमुख यांना मिळाली. त्यांनी तत्काळ तपास पथकास बस स्टॅण्ड कारवाई करण्याचे तोंडी आदेश दिले. तपास पथकाने संशयित इसमाचा शोध घेतला असता बस स्थानकाच्या भिंतीच्या आडोशाला शौचालयासमोर एक इसम संशयितरीत्या एक कापडी पिशवी हातामध्ये घेऊन फिरताना दिसला. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. सदरचा व्यक्ती जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथील काल्या ऊर्फ तस्लीम सलीम शेख असल्याचे त्याने सांगितले. त्यास हातातील पिशवीमध्ये काय आहे, असे विचारले असता गुंगीकारक नशा आणणाऱ्या नायट्राझेपमच्या गोळ्या मिळून आल्या.

मुद्देमाल जप्त

पोलिसांनी आरोपीकडून एक हजार २६ रुपये किमतीच्या नायट्राझेपम गोळ्यांचे १९ पाकिटे तसेच २३ हजार रुपये रोख रक्कम असा एकूण २४ हजार २६ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून, पोलिसांनी काल्या ऊर्फ तस्लीम सलीम शेख याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा अधिक तपास निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक रामचंद्र शिखरे हे करीत आहेत.

Breaking News: Youth arrested for selling narcotic pills

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here