Home अहिल्यानगर अहिल्यानगर: मारहाण करुन तरुणाचा खून

अहिल्यानगर: मारहाण करुन तरुणाचा खून

Breaking News | Ahilyanagar: सहा जणांनी मिळून एका तरुणाला लाकडी दांडके, दगड आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन खून केला.

Youth beaten to death

अहिल्यानगर:  केडगाव उपनगरात गुरुवारी सहा जणांनी मिळून एका तरुणाला लाकडी दांडके, दगड आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन खून केला आहे. ही घटना केडगाव देवी परिसरातील शास्त्रीनगर, रेणुकामाता मंदिराजवळ घडली आहे. विपुल छोट्या काळे (वय ३५, रा. केडगाव) असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मयत विपुल यांच्या आई शास्त्री छोट्या काळे (वय ६०) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सुरेश जाटला काळे, संदीप ढोल्या चव्हाण, कुणाल सुरेश काळे (तिघे रा. दुधसागर, केडगाव), चाईन फायर काळे, दारूचंद फादर

चव्हाण आणि सुंदर नितीन काळे (तिघे रा. साठे वस्ती, शेंडी, ता. नगर) यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी विपुल काळे यांचा आणि त्यांचे नातेवाईक असलेले संशयित आरोपी यांच्यात त्यांच्या बहिणीला नांदविण्याच्या कारणावरून वाद झाला होता. गुरुवारी सायंकाळी सहाच्या सुमारास विपुल काळे भाजीपाला आणण्यासाठी बाहेर गेले असताना, रेणुकामाता मंदिराजवळ त्याच्यावर सहा जणांनी लाकडी दांडके, दगड व लाथाबुक्क्यांनी अमानुष हल्ला केला.

या हल्ल्यानंतर संशयित घटनास्थळावरून पळून गेले. विपुलचा नातू दुर्गेश चव्हाण याने घरी येऊन आजीला म्हणजेच फिर्यादी शास्त्री काळे यांना हल्ल्याची माहिती दिली.

Breaking News: Youth beaten to death

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here