Home संगमनेर संगमनेर शहरात युवकास केली मारहाण

संगमनेर शहरात युवकास केली मारहाण

Breaking News | Sangamner Crime: २४ वर्षीय युवकाला चौघांनी मारहाण केल्याची घटना.

Youth beaten up in Sangamner city Crime

संगमनेर : संगमनेर शहरातील अकोले नाका परिसरात २४ वर्षीय युवकाला चौघांनी मारहाण केल्याची घटना शनिवारी (दि.१०) रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. या मारहाणीत युवक गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून त्याने पोलिसांना जबाब दिला आहे, त्यानुसार रविवारी (दि.११) संगमनेर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

अनिल सुरेश कुसळकर (वय २४, धंदा : ड्रायव्हर, रा. विद्यानगर, निमज, ता. संगमनेर) असे मारहाण झालेल्या युवकाचे नाव आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीवरून साई सूर्यवंशी, शुभम बर्डे, अनिकेत मंडलिक, राहुल सूर्यवंशी (सर्व. रा. संगमनेर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

याबाबत माहिती अशी की, कुसळकर हा अकोले नाका येथे उभा होता. त्यावेळी साई सूर्यवंशी, शुभम बर्ड, अनिकेत मंडलिक, राहुल सूर्यवंशी हे सर्वजण तेथे दारू पिऊन आले. त्यांनी कुसळकर याला शिवीगाळ, दमदाटी करण्यास सुरुवात केली. ‘शिवीगाळ का करता’ असे त्याने विचारले असता राग आल्याने त्या चौघांनीही त्याला बेदम मारहाण करायला सुरू केली, हातात दगड घेऊन डोक्याला, तोंडावर, ओठाला मारहाण केली. असेही कुसळकर याने दिलेल्या जबाबात म्हटले आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक भगवान मथुरे, पोलिस नाईक गणेश वाकळे पुढील तपास करीत आहेत.

Web Title: Youth beaten up in Sangamner city Crime

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here