Home अहमदनगर मुलानेच गळा चिरून केला आईचा खून, आरोपी शिर्डीतून ताब्यात

मुलानेच गळा चिरून केला आईचा खून, आरोपी शिर्डीतून ताब्यात

Breaking News | Pune Crime: मुलाने धारदार हत्याराने स्वतःच्या आईचा गळा चिरून खून (Murder) केल्याची धक्कादायक घटना,  शिर्डी परिसरातून ताब्यात.

child killed the mother by slitting her throat, the accused was detained from Shirdi

पुणे: मुलाने धारदार हत्याराने स्वतःच्या आईचा गळा चिरून खून केल्याची धक्कादायक घटना खडकी परिसरात घडली. या घटनेनंतर पसार झालेल्या आरोपीला खडकी पोलिसांनी रविवारी सायंकाळी शिर्डी परिसरातून ताब्यात घेतले.

गुंफाबाई शंकर पवार (वय ५५, मूळ रा. मुठेवडगाव, श्रीरामपूर, जि. अहमदनगर) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तर, ज्ञानेश्वर शंकर पवार (वय ३५, रा. रेंजहिल्स क्वार्टर्स, पुणे) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कौटुंबिक वादातून आणि नैराश्यातून ही घटना घडल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. खडकीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीश दिघावकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी ज्ञानेश्वर पवार हा खडकी म्युनिशन फॅक्टरीमध्ये टेलिकम्युनिकेशन विभागात तंत्रज्ञ आहे. त्याचा घटस्फोट झाल्यामुळे तो घरी एकटाच राहत होता. त्याने मुठेवडगाव गावातून आईला बोलावून घेतले. आई मुलाच्या प्रेमापोटी मुलाकडे रेंजहिल्स येथील घरी आली. परंतु शनिवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास त्याने आईचा धारदार हत्याराने गळा चिरून खून केला. त्यानंतर मुलगा पसार झाला. रविवारी सकाळी दरवाजा बंद असल्याने शेजाऱ्यांना संशय आला. त्यांनी देहू येथे राहणाऱ्या गुंफाबाई यांच्या दुसऱ्या मुलाला बोलावून घेतले. परंतु दरवाजाला बाहेरून कुलूप होते. दरवाजा उघडल्यानंतर रक्ताने माखलेल्या अवस्थेत गुंफाबाई यांचा मृतदेह आढळून आला. त्यांनी हा प्रकार कळविल्यानंतर खडकी पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

वरिष्ठ निरीक्षक दिघावकर यांच्या सुचनेनुसार तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक अण्णा गुंजाळ, पोलीस कर्मचारी सदेश निकाळजे आणि इतर कर्मचाऱ्यांनी आरोपीला सायंकाळी शिर्डी परिसरातून ताब्यात घेतले.

Web Title: child killed the mother by slitting her throat, the accused was detained from Shirdi

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here