Home अहमदनगर नाशिक-संगमनेर-पुणे सेमी हाय स्पीड रेल्वेच्या मार्गात बदल

नाशिक-संगमनेर-पुणे सेमी हाय स्पीड रेल्वेच्या मार्गात बदल

Breaking News | Ahmednagar: आता शिर्डीमार्गे नाशिक-पुणे रेल्वेसेवा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.

route of Nashik-Sangamaner-Pune Semi High Speed ​​Railway

अहमदनगर:  नाशिक-संगमनेर- पुणे जलद रेल्वेमार्गाबाबत रेल्वमंत्र्यांशी चर्चा झाली आहे. या मार्गावरील बोगद्यामुळे प्रकल्पाच्या खर्चात वाढ होत आहे. त्यामुळे नाशिक-शिर्डी-पुणे अशा पर्यायी रेल्वेमार्गाबाबत रेल्वे मंत्रालयाकडून विचार सुरू असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. हा रेल्वे मार्ग तयार झाल्यानंतर पुणे ते नाशिक हा सहा तासांचा प्रवास अवघ्या पावणे दोन तासांत पूर्ण होणार असल्याचा दावा केला जात आहे.

श्री. फडणवीस म्हणाले, मार्गातील बदलामुळे अंतरात ३३ किलोमीटरची वाढ होणार असली तरी या मार्गाचा फायदा नाशिक, पुण्यासोबत शिडींला देखील होणार आहे. जास्तीत जास्त प्रवासी उपलब्ध होऊ शकतील. अंतर वाढणार आहे, पण ट्रेनचा स्पीड जास्त ठेवणार असल्याने लवकर पुण्यात जाता येईल.

लवकरात लवकर या प्रकल्पाला मंत्रिमंडळाची मान्यता मिळणार असल्याचं उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. नाशिक- संगमनेर-पुणे रेल्वे मार्गचे अंतर २३५ किमी होते आता मार्ग बदलल्याने यात वाढ होणार आहे. १९ उड्डाणपुलांची उभारणी करण्यात येणार होती परंतु मार्ग बदलण्यामुळे यात बदल होऊ शकतो. हा मार्ग सुरुवातीपासून संपूर्ण विद्युतीकरण झालेला असणार आहे.

या मार्गावरून पहिल्या टप्प्यात ६ कोचची रेल्वे धावणार आहे. त्यानंतर १२ ते १६ कोचची रेल्वे धावणार आहे. मार्गावर एकूण २० स्टेशन असणार आहेत. हा मार्ग पूर्ण झाल्यावर पुणे-नाशिक पाच ते सहा तासांचा प्रवास अवध्या १ तास ४५ मिनिटांत पूर्ण होणार आहे. ६० टक अक्किटीतून हा निधी मिळणार आहे. या रेल्वे मार्गासाठी रेल्वे रुळ टाकणे आणि रोल्वे स्टेशन उभारण्यासाठी जमीन संपादन करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. नाशिकमधील सिजर तालुक्यातून भूसंपादन प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

Web Title: route of Nashik-Sangamaner-Pune Semi High Speed ​​Railway

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here