Home अहमदनगर अहमदनगर: तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या, चार जणांवर गुन्हा

अहमदनगर: तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या, चार जणांवर गुन्हा

Ahmednagar News: राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची घटना, चौघांवर राहुरी पोलीस ठाण्यात आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल.

Youth committed suicide by hanging, crime against four persons

राहुरी:  राहुरी तालुक्यातील वळण येथे राहुल भरत बाहिते (वय 29) या तरुणाने काही दिवसांपूर्वी त्याच्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उडली होती. या प्रकरणी चौघांवर राहुरी पोलीस ठाण्यात आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे दिव्या तुषार आढाव, वय 19 वर्षे, रा. वळण, ता. राहुरी यांनी राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले, दिव्या आढाव यांचा भाऊ राहुल भरत बाहिते हा त्याची पत्नी व मुलांसह वळण गावात राहण्यास आहे. तो शनिशिंगणापूर येथे गणेश पवार यांच्या हार फुलाचा दुकानावर मजूर म्हणून काम करत होता.

15 फेब्रुवारी रोजी रात्री राहुल बाहिते याची पत्नी रेणूका, तिची आई व मावशी तसेच गणेश पवार यांनी राहुल यास शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली होती. त्यानंतर दुसर्‍या दिवशी राहुल बाहिते यांनी त्यांची बहिण दिव्या आढाव यांना सांगीतले की, मी आजारी असल्याने काल कामाला गेलो नव्हतो. मी गावात असताना घरी माझा मालक गणेश पवार हा आला होता. त्यांनी मला मारहाण केली, असे सांगितले.

19 फेब्रुवारी रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास दिव्या आढाव या त्यांचा भाऊ राहुल यांच्या घरी गेल्या असता घराचे दार बंद होते. त्यांनी घराचा दरवाजा उघडून आत गेल्या असता त्यांचा भाऊ राहुल याने घरातील पत्र्याच्या छताच्या लोखंडी अँगलला साडीच्या साहाय्याने गळफास घेतल्याचे आढळून आले.

त्यानंतर दि. 3 मार्च रोजी राहुल याचा तेराव्याचा कार्यक्रम असताना तेथे रेणुकाची मावशी दिव्या आढाव यांना म्हणाली की, तुझ्या आईच्या नावावर असलेल्या पावतीचे पैसे दे. नाहीतर आतापर्यंत दोघे जण गेले आहेत, आता तुझाच नंबर आहे, अशी धमकी दिली. घटनेनंतर दिव्या तुषार आढाव यांनी राहुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन घडलेला प्रकार सांगितला. त्यांच्या फिर्यादीवरून आरोपी रेणुका राहुल बाहिते, राहणार वळण, ता. राहुरी. सरस्वती पारे, मिना पारे दोघी राहणार कोल्हार खुर्द, ता. राहाता व गणेश पवार, राहणार बेल्हेकरवाडी, ता. नेवासा. या चार जणांवर गुन्हा रजि. नं. 257/2023 भादंवि कलम 306, 323, 504, 506, 34 प्रमाणे शिवीगाळ, मारहाण करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी पसार झाले असून पोलीस त्यांच्या मागावर आहेत.

Web Title: Youth committed suicide by hanging, crime against four persons

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here