अहमदनगर: दोन विवाहित महिलांवर अत्याचार
Ahmednagar Crime: लग्नाचे आमिष दाखवून दोन विवाहित महिलांवर अत्याचार केल्याच्या दोन स्वतंत्र घटना उघडकीस.
अहमदनगर: लग्नाचे आमिष दाखवून दोन विवाहित महिलांवर अत्याचार (abused) केल्याच्या दोन स्वतंत्र घटना उघडकीस आलेल्या आहेत. याप्रकरणी दोघांविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल झाले आहेत. याबाबत पीडित महिलांनी फिर्यादी दिल्या आहेत.
पहिली फिर्याद, एका विवाहितेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, एका कोविड सेंटरमध्ये काम करीत असताना अक्षय बबन ससाणे (वय 26 रा. रेल्वेस्टेशन) याच्याबरोबर ओळख झाली होती. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. त्याने लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी माझ्यावर अत्याचार केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. ससाणे विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
दुसरी, एका खासगी रुग्णालयात काम करणार्या महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, पतीने सोडल्यानंतर राजू मुस्तफा शेख (रा. वाघगल्ली, नगर) याच्याबरोबर प्रेम संबंंध जुळून आले. शेख याने लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केला. लग्नाचा विषय काढला की शिवीगाळ, मारहाण करत असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. राजू शेख याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
Web Title: Abused of two married women
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App