तरुणाची लॉजमध्ये गळफास घेऊन आत्महत्या
नैराश्यात तरुणाने आत्महत्या (Suicide) केल्याची शक्यता.

नवी मुंबई : घणसोली येथील तरुणाने पावणेतील लॉजमध्ये गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची घटना घडली आहे. बुधवारी रात्री उशिरा हा प्रकार उघडकीस आला. सदर तरुण अनेक दिवसांपासून तो नैराश्यात होता, असे पोलिसांच्या चौकशीत समोर आले आहे.
राहुल मछिंद्र कणसे (22) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. तो घणसोली सिम्प्लेक्स येथे राहणारा आहे. बुधवारी त्याने पावणे येथील हायवे टच या लॉजमध्ये रूम घेतली होती. त्याठिकाणी तो एकटाच थांबला होता. रात्री उशिरापर्यंत त्याने रूम न सोडल्याने लॉजच्या कर्मचाऱ्यांनी दरवाजा वाजवला असता आत मधून कोणताही प्रतिसाद मिळत नव्हता.
यामुळे त्यांनी पोलिस व अग्निशमन दलाला माहिती दिली असता त्यांनी रूमचा दरवाजा तोडला. यावेळी आतमध्ये बेडशीटने गळफास घेऊन लटकलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळून आला. तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनानंतर गुरुवारी नातेवाईकांच्या ताब्यात दिला. राहुल हा मागील काही दिवसांपासून तणावात होता असे पोलिसांच्या चौकशीत समोर आले आहे. याच नैराश्यात त्याने आत्महत्या केल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Web Title: youth committed suicide by hanging himself in a lodge
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

















































