Home महाराष्ट्र सहल जिवावर बेतली, वाकीच्या तलावात चौघे बुडाले

सहल जिवावर बेतली, वाकीच्या तलावात चौघे बुडाले

Nagpur News: फिरायला गेलेल्या सहा जणांपैकी चौघे कन्हान नदीच्या डोहात बुडाल्याची घटना.

trip was doomed, four drowned in the river

नागपूर:  वाकी (ता. सावनेर) परिसरात फिरायला गेलेल्या सहा जणांपैकी चौघे कन्हान नदीच्या डोहात बुडाल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. यात एका विद्यार्थिनीचा समावेश आहे. सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास त्यांचे शोधकार्य सुरू करण्यात आले असून, अंधार होईपर्यंत शोधकर्त्यांच्या हाती काहीही गवसले नाही.

विजय ठाकरे (१८), सोनिया मरसकोल्हे (१७, दोघेही रा. नारा, नागपूर), अंकुश बघेल (१७) व अर्पित पहाळे (१९, दोघेही रा. कामठी) अशी बुडालेल्यांची नावे आहेत. विजय पोहण्यासाठी डोहात उतरला आणि गटांगळ्या खाऊ लागला. त्याला वाचविण्यासाठी आधी सोनिया, नंतर अंकुश व अर्पित पाण्यात गेले आणि बुडाले. पोलिसांनी घटनेच्या तीन तासांनंतर मदतकार्य सुरू केले. यासाठी एसडीआरएफच्या जवानांची मदत घेण्यात आली. मुळात एसडीआरएफच्या जवानांच्या तुलनेत या डोहाचे स्वरूप आणि खाचखळगे याबाबत स्थानिक पट्टीच्या पोहणाऱ्यांना चांगल्या तऱ्हेने माहिती आहे. त्यांनी अनेक मृतदेह याच डोहातून बाहेर काढले आहेत.

Web Title: trip was doomed, four drowned in the river

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here