Home अहमदनगर अहमदनगर: शेतीच्या वादातून मोटारसायकल दिली पेटवून

अहमदनगर: शेतीच्या वादातून मोटारसायकल दिली पेटवून

Ahmednagar News: शेताजवळ लावलेली मोटारसायकल पेटवून दिल्याची घटना.

motorcycle was set on fire due to an agricultural dispute

जामखेड : वडिलांकडून विकत घेतलेली शेतजमीन ‘तू आम्हाला परत का देत नाहीस?” या कारणावरून एका व्यक्तीने शेताजवळ लावलेली मोटारसायकल पेटवून दिल्याची घटना घडली आहे. ही घटना बुधवारी (दि. १६) सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली. या प्रकरणी जामखेड पोलिस ठाण्यात एकजणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत गणेश रामभाऊ हजारे यांनी फिर्याद दिली आहे. गणेश हजारे यांचे वडील रामभाऊ हजारे यांनी जामखेड तालुक्यातील जवळा गावात राहणारे महेबूब गुलाब शेख यांच्या मालकीच्या जवळा गावात शेत गट नंबर २६५ मध्ये असलेली शेतजमीन १६ वर्षांपूर्वी विकत घेतलेली आहे. बुधवारी (दि. १६) सकाळी साडेअकराच्या सुमारास गणेश हजारे व त्याचे वडील दोघेजण मोटारसायकलवर जवळा गावच्या शिवारातील शेतात गेले होते. यावेळी तेथे नबाब महेबूब शेख (रा. जवळा, ता. जामखेड) हा तेथे आला. गणेश हजारेला म्हणाला की, तुझ्या वडिलांनी माझ्या वडिलांकडून विकत घेतलेली शेतजमीन आम्हाला परत का देत नाहीस? त्याचवेळी शेताजवळ लावलेली गणेश हजारेची मोटारसायकल (एमएच १२ एसएच १४६९) पेटवून दिली. यात दुचाकी खाक झाली, असे फिर्यादीत म्हटले आहे.

या प्रकरणी नबाब महेबूब शेख याच्याविरोधात जामखेड पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉन्स्टेबल लोखंडे करीत आहेत.

Web Title: motorcycle was set on fire due to an agricultural dispute

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here