Home क्राईम नाशिक शहर हादरले : शस्त्राने वार करून तरुणाचा खून, आठवडाभरात तिसरा खून

नाशिक शहर हादरले : शस्त्राने वार करून तरुणाचा खून, आठवडाभरात तिसरा खून

Nashik Crime: नाशकात शस्त्राने वार करून तरुणाचा खून (Murder).

Youth stabbed to death, third murder in a week

नाशिक : अंबड गावातील तरुणाचा श्रीकृष्णनगर भागात भरदिवसा वार करीत खून करण्यात आल्याची घटना गुरुवारी (दि.१७) घडली असून या घटनेने परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. विशेष म्हणजे अंबड भागात आठ दिवसांतच तिसरा खून झाल्याने अंबड परिसरात कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यात पोलिसांना अपयश आल्याची टीका पोलिस प्रशासनावर होत आहे. तर दुसरीकडे १५ ऑगस्ट रोजी नाशिक शहरातील कस्तुरबा नगर येथेदेखील एका महिलेची हत्या करण्यात आल्याचे उघड झाले आहे.

अंबड-सातपूर लिंकरोड भागात मागील गुरुवारी (दि.१०) टोळक्याने धारदार शस्त्राने वार करून मेराज खान (१८) व इब्राईम खान (२३) या दोघांचा खून केल्याची घटना ताजी असतानाच अवघ्या आठ दिवसांतच मयूर केशव दतीर (२०, रा. अंबड) या तरुणाचा खून झाल्याने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाला आहे. अंबडच्या श्री कृष्णनगर भागात आपापसातील वादातून हा प्रकार घडला आहे. मात्र, मृत मयूर दातीर याचा खून करणारा संशयित करण कडुस्कर हा सराईत गुन्हेगार असून त्याने त्याच्या अन्य दोन साथीदारांना सोबत घेऊन मयूर दातीरचा खून केल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.

प्रियकराने केला ‘लिव्ह इन’मधील प्रेयसीचा खून

लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या प्रियकराने प्रेयसीसोबत भांडण झाल्याने पाठीत चाकू खूपसून तिचा खून केल्याची घटना कस्तुरबानगर भागात (दि. धारदार शस्त्राने १५) घडली. आरती श्याम पवार (४०, रा. कस्तुरबानगर, होलाराम कॉलनी) असे मृत प्रेयसीचे नाव आहे. पोलिसांनी श्याम अशोक पवार (३२, रा. मल्हारखाण, अशोकस्तंभ) याला अटक केली आहे. मूळची ठाणे जिल्ह्यातील असलेल्या आरती हिचा विवाह झाला होता. मात्र, कौटुंबिक कारणातून तिचा पती तिला सोडून दुसरीकडे राहायला गेला. याच कालावधीत तिचे श्याम पवार याच्यासोबत प्रेम संबंध निर्माण झाल्याने ती मुलांसह श्यामसोबत राहत होती. दोघात भांडण झाल्याने श्यामने तिचा खून केला.

Web Title: Youth stabbed to death, third murder in a week

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here