Home नाशिक तलाठी भरती परीक्षेचा पेपर फुटला; संशयिताला बेड्या

तलाठी भरती परीक्षेचा पेपर फुटला; संशयिताला बेड्या

Talathi Recruitment Exam Paper Cracked: परीक्षेतील काही प्रश्नांचे फोटो परीक्षा केंद्राबाहेर फिरणाऱ्या संशयिताकडे आढळल्याने भरती प्रक्रियेचा पेपर फुटल्याचे समोर आले.

Talathi Recruitment Exam Paper Cracked Shackles to the Suspect

पंचवटी | नाशिक: राज्य  शासनातर्फे घेण्यात येणाऱ्या तलाठी भरती प्रक्रियेच्या ऑनलाईन परीक्षेला विचारण्यात आलेल्या परीक्षेतील काही प्रश्नांचे फोटो परीक्षा केंद्राबाहेर फिरणाऱ्या संशयिताकडे आढळल्याने भरती प्रक्रियेचा पेपर फुटल्याचे समोर आले आहे. केंद्रात परीक्षा देणाऱ्या साथीदाराला मुन्नाभाई एमबीबीएस’ या चित्रपटातील प्रसंगांप्रमाणेच हायटेक पद्धतीने कॉपी पुरविणाऱ्या वैजापूर येथील संशयिताला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे. त्याच्याकडून वॉकी टॉकीसह दोन मोबाईल टॅब जप्त करण्यात आले

दिंडोरीरोडवरील शिव प्लाझा इमारतीतील वेब एजी इन्फोटेक या केंद्रावर तलाठी भरतीसाठी गुरुवारी (दि.१७) ऑनलाईन परीक्षा सुरू असताना संशयित गणेश शामसिंग गुसिंगे यास परीक्षा केंद्राच्या आवारात संशयास्पदरीत्या फिरताना पोलिसांनी ताब्यात घेतले. तलाठी भरतीप्रक्रियेसाठी राज्य शासनामार्फत राज्यभरात ऑनलाईन परीक्षा सुरू असताना हा प्रकार उघडकीस आला आहे.

त्यामुळेच पोलिसांचा संशय बळावला

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर येथील गणेश गुसिंगे परीक्षा केंद्राच्या आवारातील रस्त्यावर कानाला हेडफोन लावून बोलत असल्याचे दिसून आल्याने पोलिसांना संशय बळावला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, पोलिसांनी त्याला खाक्या’ दाखवत ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली असता आक्षेपार्ह वस्तू आढळून आल्या.

Web Title: Talathi Recruitment Exam Paper Cracked Shackles to the Suspect

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here