Home क्राईम संगमनेर: तरुणाने ११२ डायल करून पोलिसांना खोटी माहिती दिली अन…..

संगमनेर: तरुणाने ११२ डायल करून पोलिसांना खोटी माहिती दिली अन…..

Sangamner Crime:   मागील वादाच्या कारणावरून एका जणांनी पोलिसांना फोनवरून खोटी दिली अन निष्पन्न झाल्यानंतर तरुणावर गुन्हा. मागील वादाच्या कारणावरून केला हा प्रकार.

youth dialed 112 and gave false information to the police Crime Filed

संगमनेर: मागील वादाच्या कारणावरून एका जणांनी पोलिसांना फोनवरून खोटी  माहिती दिली खोटी माहिती दिल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी योगेश खेमनर (रा.जांभुळवाडी ता.संगमनेर) याच्या विरुद्ध घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत घारगांव पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, योगेश खेमनर याने संतोष कोकाटे असे खोटे नाव सांगुन भागवत कुदनर यांचा ढंपर/ट्रक चोरुन अवैध वाळुची तस्करी करत आहे अशी माहिती नियंत्रण कक्षास ११२ वर कळविली.

त्याबाबत ११२ चे कर्मचारी यांनी कॉल अटेंड करुन खात्री केली असता सदरचा कॉलर संतोष कोकाटे नसुन तो योगेश खेमनर याचा क्रमांक असल्याचा निष्पन्न झाले. तसेच यातील भागवत कुदनर याची गाडी दोन ते तीन दिवसापासुन घरीच उभी असल्याचे आढळुन आले. याबाबत योगेश खेमनार यास विचारणा केली असता त्याने विकास गायकवाड याने मला फोनवर माहिती दिल्याचे कळविले आहे. तेव्हा विकास गायकवाड यांची पोलिसांनी  चौकशी केली असता त्याने सांगितले की, मी योगेश खेमनर याला फोन केलेला नाही.

यातील योगेश खेमनर व भागवत कुदनर याचा पुर्वीपासुन वाद असुन त्या वादातुन भागवत खेमनर याला पोलीसामार्फत कायदेशीर त्रास व्हावा या हेतुने डायल ११२ ला खोटी माहिती दिली. याबाबत योगेश खेमनर याचेकडे फोनवर खोटी माहिती का दिली अशी विचारणा केली असता त्याने फोनवर अरेरावीच्या भाषा वापरली व तुम्हाला काय करायचे ते करा मी माहिती खोटी दिली गुन्हा दाखल करा अशी भाषा वापरली.

याप्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल अनिल भांगरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून घारगांव पोलिसांनी योगेश खेमनर यांच्या विरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर २६३/२०२३ भादवी कलम १७७, १८२, १८९, ५०७ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक संतोष खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉन्स्टेबल श्री.लोंढे करत आहेत.

Web Title: youth dialed 112 and gave false information to the police Crime Filed

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here