Home संगमनेर संगमनेरात तुफान हाणामारी; धारदार शस्त्रांचा वापर, तणाव अन राखीव पोलीस दल तैनात

संगमनेरात तुफान हाणामारी; धारदार शस्त्रांचा वापर, तणाव अन राखीव पोलीस दल तैनात

Sangamner News:  शहरातील जोर्वे नाका परिसरात तुफान हाणामारी झाल्याची घटना (Sangamner at stormy skirmishes ), धारदार शस्त्रांचा वापर, सहा जण जखमी, शहरात तणापूर्ण वातावरण, राज्य राखीव पोलीस दल तैनात करण्यात आले आहे.

Sangamner at stormy skirmishes Use of sharp weapons, tension

संगमनेर:  शहरातील जोर्वे नाका परिसरात तुफान हाणामारी झाल्याची घटना, धारदार शस्त्रांचा वापर, सहा जण जखमी, शहरात तणापूर्ण वातावरण, राज्य राखीव पोलीस दल तैनात करण्यात आले आहे. किरकोळ कारणावरून तुफान हाणामारी झाल्याची घटना काल रविवारी सायंकाळी घडली. या हाणामारीत धारदार शास्त्रांचा वापर झाल्याने सहाजण गंभीर जखमी झाले. यामुळे शहरामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्री उशिरा पोलिसांच्या बंदोबस्तात जोर्वे नाका परिसरातील अतिक्रमण हटविण्यात आले.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, जोर्वे येथील काही युवक संगमनेरला आले होते. संगमनेर येथील काम आटोपून ते आपल्या घरी जात होते. जोर्वे नाका परिसरात हे युवक आले असता या ठिकाणी रहदारी ठप्प झालेली होती. युवकांनी आपल्या मोटरसायकलचे हॉर्न वाजवून पुढे जाण्याचा प्रयत्न केला. हॉर्न वाजवल्याचा राग आल्याने जोर्वे नाका परिसरात थांबलेल्या काही लोकांनी या दोन युवकांना मारहाण केली. यावेळी जोरदार शाब्दिक बाचाबाची झाली. यानंतर हे युवक जोर्वे येथे निघून गेले. त्यांनी घडलेला प्रकार गावात सांगितला. यानंतर जोर्वे येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने पोलीस ठाण्यात आले. त्यांनी याबाबत पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली.

पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला. यानंतर हे ग्रामस्थ जोर्वे येथील जात होते. जार्वेे नाका परिसरात एका समाजाच्या युवकांनी या नागरिकांना अडविले. या ठिकाणी जोरदार जोरदार शिवीगाळ आणि हाणामारी झाली. एका समाजाच्या काही युवकांनी धारदार शास्त्रांचा वापर केला. या हाणामारीत जोर्वे येथील सहाजण जखमी झाले. जखमींमध्ये जितेंद्र दिघे, अजित थोरात,सुमीत थोरात, तन्मय दिघे, विजय थोरात, कुंडलिक दिघे यांचा समावेश आहे. धारदार शास्त्रांचा वापर झाल्याने सर्वजण गंभीर जखमी झाले.

जोर्वे येथील युवकांना मारहाण झाल्याचेे समजताच जोर्वेेे येथील ग्रामस्थ रात्री उशिरा मोठ्या संख्येने शहर पोलीस ठाण्यात जमा झाले. आरोपींविरुद्ध त्वरित कठोर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली. या घटनेमुळे शहरामध्येे तणावाच वातावरण निर्माण झाले. घटनेचेे गांभीर्य ओळखून पोलिसांनी त्वरित पावले उचलली. घटनास्थळी मोठा पोलीस फौज फाटा पाठवण्यात आला.

शहरातील जोर्वेेे नाका परिसरात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झालेले आहे. या अतिक्रमणामुळेच कालची घटना घडली नगरपालिका प्रशासनाने रात्रीी उशिरा पोलीस बंदोबस्तात यााा ठिकाणचे अतिक्रमण पाठविण्यात आले या अतिक्रमणालााा एका युवकाने विरोध केला. यामुळे अतिक्रमण हटाव मोहीम काही वेळा थांबण्यात आली होती पोलिसांनी त्वरित अहमदनगर येथे घटनेची माहिती दिली.

घटनेचे गांभीर्य ओळखून जिल्हा पोलीस प्रमुखांनी संगमनेर शहरात त्वरित राज्य राखीव पोलीस दल रवाना केल्याची माहिती उपलब्ध झाली. जोर्वे येथील युवकांना मारहाण झाल्याने आरोपींना त्वरित अटक करावी या मागणीसाठी जोर्वे येथील ग्रामस्थांनी रात्री बारा वाजता शहर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या केले या ठिकाणी ग्रामस्थांनी जोरदार घोषणाबाजी केली यामुळे वातावरण तणावपूर्ण बनले होते.

Web Title: Sangamner at stormy skirmishes Use of sharp weapons, tension

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here