Home संगमनेर संगमनेरमधील तरुण गुजरातमध्ये ८ दिवसांपासून बेपत्ता

संगमनेरमधील तरुण गुजरातमध्ये ८ दिवसांपासून बेपत्ता

Breaking News | Sangamner: तरुण अंकलेश्वर येथून बेपत्ता झाल्याची माहिती समोर

Youth from Sangamner missing in Gujarat for 8 days

संगमनेर: संगमनेरच्या उपनगरातील मालदाड रोडवरील रहिवासी असलेला तरुण महेश अरुण पडघलमल (वय ३४ वर्षे) हा गाडीवर क्लीनर म्हणून गुजरातमध्ये गेला. तो अंकलेश्वर येथून बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली असून त्याच्या कुटुंबीयांनी अंकलेश्वर पोलीस ठाण्यात या संदर्भात तक्रार दाखल केली आहे. सात दिवसांचा कालावधी उलटून देखील अद्याप त्याचा शोध लागलेला नाही. महेश

पडघलमल हा मालवाहतूक गाडीवर क्लीनर म्हणून काम करत असून सोमनाथ माधव सातपुते याच्याबरोबर तो ३ जूनला गुजरातच्या अंकलेश्वर येथे गेला होता. मात्र पाच तारखेला तो बेपत्ता झाल्याची माहिती सोमनाथ सातपुते यांनी महेश पडघलमल याच्या घरी दूरध्वनी करून कळविली होती. त्यामुळे कुटुंबियांनी तातडीने अंकलेश्वर येथे जात त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला तसेच अंकलेश्वर पोलीस ठाण्यात तो बेपत्ता झाल्याचे फिर्याद दाखल केली आहे. दरम्यान अद्यापही महेश पडघलमल याचा शोध लागत नसल्याने कुटुंबातील सदस्य चिंतेत आहे.

Web Title: Youth from Sangamner missing in Gujarat for 8 days

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here