Home संगमनेर आमदार थोरातांच्या मार्गदर्शनामुळे जिल्हा परिषद शाळा अधिक सक्षम

आमदार थोरातांच्या मार्गदर्शनामुळे जिल्हा परिषद शाळा अधिक सक्षम

आमदार थोरातांच्या मार्गदर्शनामुळे जिल्हा परिषद शाळा अधिक सक्षम

संगमनेर : – माजी शिक्षणमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी मागील वर्षापासुन तालुक्यातील जि.प. शाळांची गुणवत्ता वाढविण्यासाठी केलेल्या विशेष प्रयत्नांमुळे संगमनेर तालुक्यातील १९५ विद्यार्थ्यांनी इंग्रजी शाळेला सोडचिट्टी देऊन जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेश घेतला आहे.

You May Also LikeSuhana Khan age, Birthdate, Biography, height

आमदार बाळासाहेब थोरात यांनी आपल्या शिक्षणमंत्री पदाच्या काळात ११ वीच्या ऑनलाईन प्रवेशाचा घोळ मिटवला तसेच “बेस्ट ऑफ फ।ईव्ह” शिक्षणाच्या मुलभुत अधिकारासाठी एक विद्यार्थी असलेल्या ठिकाणी शिक्षकाची नेमणुक केली. अनेक क्रांतीकारी निर्णय घेतल्यामुळे अत्यंत वादळी ठरणारे शिक्षण खाते लोकाभिमुख झाले. मागील दोन वर्षापासुन जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता सुधारण्यासाठी तालुक्यात खास प्रयत्न सुरु आहेत. त्या अंतर्गत इंग्रजी शिक्षणावर भर दिल्याने, जिल्हा परिषद शाळांमधुन खासगी शाळांमध्ये गेलेले विद्यार्थी पुन्हा परतले आहेत. यावर्षी इंग्रजी माध्यमाची शाळा सोडुन  जिल्हा परिषदेच्या शाळेत १२३ मुले व ७२ मुली असे एकुण १९५ विद्यार्थी दाखल झालेल्या विद्यार्थ्यांची  केंद्रनिहाय संख्या अशी, संगमनेर खुर्द (2)  , देवगाव (४), पिंपरकणे (१९), सारोळे पठार (११), चंदनपुरी (५), वडगावं पान (१८), वरवंडी (५),  तळेगाव दिघे (५) यांसारख्या अनेक गावांमधील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. गेल्या काही वर्षात जिल्हा परिषदेच्या शाळांनी लोकसहभागातुन कात टाकल्याने , व या महत्वाच्या बदलाला नव्या दमाच्या, विचारांच्या व नव्या उमेदीच्या शिक्षकांची साथ लाभल्याने बदलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळांसाठी तालुक्यात परिवर्तनाचे वारे वाहु लागले आहे.

याबाबत आमदार थोरात म्हणाले कि, प्रत्येक गावात इंग्रजी शाळेत व मराठी शाळेत व शिकणारे असे दोन गट निर्माण झाले आहेत. हे थांबवण्याचे समाजधु‍रिनी व राज्यकर्ते आणि कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला पाहिजे. काही इंग्रजी माध्यमांच्या शाळा गुणवत्तापुर्व शिक्षण देत आहेत. मात्र काही याबाबत मागे पडत  आहे. त्या तुलनेत जि.प. शाळा ही सक्षम होत आहेत. हे आनंददायी असुन मराठी शाळेत शिकलेले अधिक विद्यार्थी पुढे जाऊन एमपीएससी, युपीएससीच्या परीक्षेत चमकले आहेत. याकडे दुर्लक्ष  करता येणार नाही तसेच यावर्षी विद्यार्थी मैदानावर अधिक चमकले पाहिजे, यासाठी विविध शाळा व गावांमधुन खेळांसाठी प्रोत्साहन अभियान सुरु असल्याचेही आ. थोरात म्हणाले.


मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा


आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. रहा अपडेट दररोज. धन्यवाद.  मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा.


ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा. आपल्याला ही बातमी आवडल्यास फेसबुक वर जरूर शेअर करा धन्यवाद.


websites

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here