Home अकोले झेडपीच्या बदल्यांच्या आदेश अंमलबजावणीला अकोल्यात सापडला अखेर मुहूर्त

झेडपीच्या बदल्यांच्या आदेश अंमलबजावणीला अकोल्यात सापडला अखेर मुहूर्त

अकोले: अहमदनगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जिल्हा परिषद कर्मचारी व अधिकारी यांच्या जिल्हाअंतर्गत प्रशासकीय व विनंती बदल्यांचा आदेश ६ जून २०१९ रोजी काढला होता, पण या आदेशाची तब्बल एक महिन्यानंतर अकोल्यात अंमलबजावणी करण्याचा मुहूर्त अधिकाऱ्यांना सापडला असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाची पायमल्ली करण्याचा एक वेगळाच पायंडा अकोल्यात या निमित्ताने पडल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे..

अहमदनगर जिल्हा परिषदेच्या दि. ३, ४, ५ जून २०१९ रोजी झालेल्या समुपदेशनाने बदली प्रक्रिया अत्यंत पारदर्शी पद्धतीने राबविण्यात आल्यानंतर याची अंमलबजावणी करण्यासाठी जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दि. ६ जून रोजी बदल्यांचे आदेश काढण्यात आले. या आदेशामध्ये दि. १५ मे २०१९ शासन निर्णयातील मार्गदर्शक सूचनांप्रमाणे जि. प. अंतर्गत विविध प्रशासकीय विभागाच्या अधिनस्त कार्यरत कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात येवून त्यांना ७ जून २०१९ रोजी कार्यालयातील वेळेनंतर कार्यमुक्त करण्यात यावे आणि त्यानंतर ते ज्या ठिकाणी कार्यरत होते, त्या ठिकाणी त्यांचे वेतन व भत्ते दि. ७ जून २०१९ नंतर अदा करण्यात येवू नयेत, असे स्पष्ट आदेश असतानाही अकोले पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी पंचायत समितीच्या बदली करण्यात आलेल्या सहा कर्मचाऱ्यांच्या आदेशाची अंमलबजावणी केली नाही.

जि. प. प्रशासन विभागाचे लक्ष वेधल्यानंतर प्रशासनाने तातडीने जिल्हाभर या आदेशाची अंमलबजावणी करावी; अन्यथा हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करू, असे फर्मान काढल्यावरही अकोल्यात या आदेशाला केराची टोपली दाखविण्यात आली व त्यानंतर तब्बल महिन्यानंतर काल बुधवार दि. ३ जुलै २०१९ रोजी बदली झालेल्या या कर्मचाऱ्यांना सोडण्याचा मुहूर्त पंचायत समिती प्रशासनाला सापडला. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाची पायमल्ली करण्याचा एक वेगळा पायंडा पंचायत समिती प्रशासनाने पाडल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे. आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी उशीर का झाला? प्रशासन कुणाला पाठीशी घालत होते? अशा उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.

Website Title: ZP’s Transfer Orders Are Finally Found In Akola

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here